Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची १९६६ ने वाढ; ६८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:24 PM2021-05-08T23:24:10+5:302021-05-08T23:24:35+5:30
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली.
Coronavirus in Thane : ठाणे - जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८६ हजार ७३७ बाधीत व आठ हजार तीन मृतांची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरात आज ४७९ रुग्णांची वाढ होऊन न ऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह शहरात एक लाख २३हजार ७१७ रुग्णांची व एक हजार ७४४ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. कल्याण डोंबिवलीत ५३३ रुग्णांची व १८ मृतांची वाढ आज झाली आहे. येथील एकूण एक लाख २५ हजार ९६० बाधितांना एक हजार ५३० मृतांची नोंद करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये ७०र रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ३७५ रुग्णांची व ४४५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत १२ रुग्ण आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार ३५ व ४०३ मृत्यू आज नोंदले गेले आहेत. मीरा भाईंदरला दिवसभरात २२५ बाधितांसह नऊ मृत्यू झाले आहेत.या शहरात आजपर्यंत ४५ हजार ७६२ बाधीत व एक हजार १०५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथला ७० बाधीत आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण संख्या १८हजार ४१७ बाधीत व ४९३ मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूर नगर परिषदेत ९७ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरातील १९ हजार ४९० बाधितांची व २११ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. ग्रामीण गांवपाड्यांत आज २४१ रुग्णां व आठ मृतांची वाढ झाली. आजपर्यंत या परिसरातील बाधितांची संख्या २९ हजार ७४ व ७३० मृत्यू नोंदले गेले आहेत.