coronavirus: ठाणे महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी, १० एप्रिलपर्यंत अँन्टिजेन टेस्ट करण्यासाठी धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:33 PM2021-04-08T13:33:37+5:302021-04-08T13:34:20+5:30
coronavirus in Thane : विविध आस्थापनांमध्ये काम करणा:यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळ पासूनच महापालिकेच्या विविध केंद्रावर नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते.
ठाणे - विविध आस्थापनांमध्ये काम करणा:यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळ पासूनच महापालिकेच्या विविध केंद्रावर नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे यांनी कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली तरच त्यांना काम करायला दिले जाईल असे आदेश आहेत. त्यामुळेच ही गर्दी ओसंडल्याचे दिसत होते. परंतु महापालिकेची काही केंद्र सकाळी ११ नंतर सुरु झाल्याने नागरीकांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत होते.
राज्य सरकारच्या वतीने मिनी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानुसार आता त्यिावश्यक सेवेत काम करणारे, दुकानात काम करणारे, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे, रिपेरिंगचे काम करणारे आदींसह विविध आस्थापनेत काम करणा:यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. येत्या 1क् एप्रिलच्या आत ही चाचणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच गुरुवारी सकाळ पासून शहरातील अनेक केंद्रावर चाचणी करुन घेण्यासाठी एकच गर्दी उसळल्याचे दिसून आले. त्यातही रिक्षा चालक , टॅक्सी चालक यांना देखील १० एप्रिल र्पयत चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने त्यांनी देखील चाचणी करुन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करीत असल्याचे दिसत होते.
ठाणे महापालिका हद्दीत अॅन्टीजेन चाचणीचे १२ केंद्र असून ते शहराच्या विविध भागात सुरु आहेत. त्यानुसार मानपाडा, टेंभी नाका, कळवा, वागळे, सावरकरनगर, लोकमान्य नगर आदींसह इतर केंद्रांच्या बाहेर देखील सकाळ पासूनच नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु अनेक केंद्र ११ नंतर सुरु करण्यात येत असल्याने रांगते उभे असलेल्या नागरीकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यातही अतिशय धिम्या गतीने अनेक केंद्रावर कामे सुरु असल्याचे चित्र दिसत होते. तर अनेक केंद्रावर मनुष्यबळाचा अभावही जाणवत होता. त्यातही उशिराने केंद्र सुरु झाल्याने अनेक केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. व्यापा:यांची दुकाने सुरु होणार अशी आशा असल्याने येथील कर्मचा:यांनी चाचणी करुन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
ठाणो महापालिका हद्दीत १२ केंद्रावर अॅन्टीजेन चाचणी केली जात आहे. परंतु विविध आस्थापनांवरील कर्मचा:यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने केंद्रावर गर्दी झाली होती.
- डॉ. राजू मुरुडकर (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा)