CoronaVirus : अंबरनाथमध्ये वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी परराज्यातील नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:08 PM2020-05-04T13:08:18+5:302020-05-04T13:08:46+5:30
एकाच वेळी ही गर्दी झाल्याने रुग्णालय कक्षात देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, वैद्यकीय चाचणी बंधनकारक असल्याने आणि त्या अर्जावर वैद्यकीय अधिकारी त्या असणे बंधनकारक केल्याने हा गोंधळ उडाला होता.
अंबरनाथ : शहरात अडकून पडलेले पर्यटक विद्यार्थी आणि कामगार हे त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात संदर्भात अर्ज भरण्याचे आणि वैद्यकीय चाचणी करून घेण्याची घाई झाली आहे. अंबरनाथ शहरात देखील अनेक परराज्यातील नागरिकांनी अर्ज भरून अंबरनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी गर्दी केली होती, एकाच वेळी ही गर्दी झाल्याने रुग्णालय कक्षात देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, वैद्यकीय चाचणी बंधनकारक असल्याने आणि त्या अर्जावर वैद्यकीय अधिकारी त्या असणे बंधनकारक केल्याने हा गोंधळ उडाला होता.
अखेर अंबरनाथ नगरपालिकेने जिल्हा रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा करून वैद्यकीय चाचणीचे अधिकार शहरातील खासगी डॉक्टरांकडून करून घेण्यासंदर्भात मंजुरी मिळवली. शहरातील डॉक्टरांना देखील वैद्यकीय चाचणीचा अहवाल देता येणार असले तरीही रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी छाया रुग्णालयातच वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी गर्दी केली होती, रुग्णालय आवारात एकाच वेळी एवढी गर्दी झाल्याने सामाजिक अंतर ठेवणे देखील त्या नागरिकांना शक्य झाले नाही.
दुसरीकडे अर्जाचा नमुन्याची झेरॉक्स घेण्यासाठी रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या झेरॉक्स दुकानावर देखील प्रचंड गर्दी दिसत होती, अर्ज घेण्यासाठी देखील नागरिकांनी लांबच लांब रांग लावली होती, त्या ठिकाणीदेखील सामाजिक अंतर ठेवण्यात आले नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे सोमवारी रुग्णालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.