coronavirus : डोंबिवलीतील कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 78 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:36 PM2020-04-20T16:36:44+5:302020-04-20T16:37:18+5:30
डोंबिवली पश्चिमेतील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याची वैद्यकीय चाचणी 13 एप्रिल रोजी पॉङिाटीव्ह आली होती.
कल्याण - डोंबिवलीतील कोराना बाधित 30 वर्षीय तरुणाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत आत्तार्पयत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 झाली आहे. त्याचबरोबर आज महापलिका हद्दीत कोरोनाचे आणखीन तीन नवे रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78 झाली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याची वैद्यकीय चाचणी 13 एप्रिल रोजी पॉङिाटीव्ह आली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार घेत असताना त्याचा आज सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला आहे. महापलिका हद्दीत यापूर्वी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ही संख्या आत्ता तीनवर पोहचली आहे.
आज नव्याने कोरोनाचे तीन रुग्ण मिळून आले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील 24 वर्षीय तरुणी, कल्याण पश्चिमेतील एक तरुणाला व कल्याण पूव्रेतील 65 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. या तिन्ही रुग्णाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपचारांती आत्तार्पयत 28 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47 आहे.
दरम्यान महापालिकेच्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जो भाग कंन्टेनमेंट झोन घोषित केला आहे. जो संभाव्य हाय रिस्क झोन आहे. त्याठिकाणच्या दुकानदारांनी घरपोच साहित्य पोहचविण्यची सुविधा करुन द्यावी. काऊंटवर विक्री करु नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
मेडीकल, रुग्णालये, दवाखाने वगळता किराण दुकानदार, अन्नधान्य, भाजीपाला फळ विक्रेते, मटण आणि चिकन विक्रीची दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येणार आहे. त्यांना काऊंटवर विक्री करता येणार नाही. तसेच नागरीकांनीही काऊंटवर जाऊन खरेदी करु नये यासाठी प्रतिबंध करण्यात आले. दुकानदारांनी ग्राहकाना लागणा:या वस्तू या घरपोहच पोचविण्याची सुविधा द्यावा. मनुष्यबळ कमी असल्याने दुकानदारांनी त्यासाठी प्रभाग अधिका:याची मदत घ्यावी असे आयुक्तांनी सूचित केले आहे.
संभाव्य हाय रिस्क परिसरात कल्याण पूवेतील नेतीवली टेकडी, डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कंन्टेनमेंट क्षेत्रत नांदिवली, पिसवली, चक्की नाका, भगवाननगर, वायलेनगर, महात्मा फुलेनगर मोहने, मांडा टिटवाळा, विजयनगर, आयरेगाव, तुकारामनगर, जिमखाना, बालाजी गार्डन समता नगर, टावरे पाडा, पाथर्ली रोड, मानपाडा रोड, भोईरवाडी, देवी चौक, टेलकोसवाडी, रेतीबंदर, कोपर क्रास रोड, उमेशनगर या परिसराचा समवेश आहे.