Coronavirus: अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 11:05 AM2020-04-06T11:05:33+5:302020-04-06T11:57:12+5:30
मधुमेह आणि हृदयाच्या विकासासोबतच त्याच्यामध्ये कोरोनाचे देखील काही लक्षण आढळल्याने केईएम रुग्णालय प्रशासनाने त्याची कोरोना टेस्ट केली होती.
अंबरनाथ: अंबरनाथ बुवा पाडा परिसरातील एका 50 वर्षीय इसमाला कोरोनाण्याची लागण झाली होती. त्या रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
अंबरनाथ गोवा परिसरात राहणारा हा व्यक्ती 19 मार्च रोजी उत्तर प्रदेशमध्ये आपल्या कौटुंबिक सोहळा साठी गेला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली होती. त्या रुग्णाला मधुमेहाचा आणि हृदयाचा देखील त्रास होता. त्या कारणास्तव अंबरनाथमधील एका खाजगी रुग्णालयात देखील त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. प्रकृती सुधारत नसल्याने त्या रुग्णाला 26 मार्च रोजी मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.
मधुमेह आणि हृदयाच्या विकासासोबतच त्याच्यामध्ये कोरोनाचे देखील काही लक्षण आढळल्याने केईएम रुग्णालय प्रशासनाने त्याची कोरोना टेस्ट केली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्याला लागलीच मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 2 एप्रिल रोजी भाभा रुग्णालयात दाखल झाल्यावर अवघ्या चार दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आहे. इतर आजाराने त्रस्त असल्याने नेमका हा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे की कोरोणामुळे झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.