Coronavirus: वेळेत रुग्णवाहिका आणि उपचार न मिळाल्याने कोरोना लढवय्याचा मृत्यू; ठाण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 08:38 PM2020-06-15T20:38:00+5:302020-06-15T20:38:16+5:30
ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या
ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यु होणे असे प्रकार घडत आहेत. या मुद्यांवरून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांन चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर झोपी गेलेल्या महापालिकेने तीन परिमंडळाअंतर्गत 10 ते 15 रुग्णवाहिकेची सुविधेसह टीएमटीच्या मिडी बसेसचे रुपातंर रुग्णवाहिकेमध्ये केले. असे असतांना, देखील शनिवारी ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या व सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट असलेल्या एका महिलेचा रुग्णवाहिका व वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिका हद्दीत रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या. त्यात सोमवार पर्यंत त्या कामावर होत्या. तसेच गुरुवारी 11 जून रोजी त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट केली. 12 जूनरोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांना दूरध्वनी करून टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळविण्यात आले होते. याची माहिती मिळताच, घरातील सदस्यांनी स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयात धाव घेवून, रुग्णवाहिका व रुग्णालयात जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका काही वेळेवर मिळाली नाही. तब्बल चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना रुग्णवाहिका मिळाली. त्यात ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेच्या पतीने सायन रुग्णालयाच्या मॅडमला फोन केला असता, त्यांनी सायन हॉस्पीटल येथे आणा असे सागितले. त्यानुसार त्यांना सायन रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासले असता, त्यांचा प्रवासाद्र्म्यांच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेमुळे एखाद्या करोना लढवय्या सायन हॉस्पीटल येथे काम करणारा व्यक्तीची हि अवस्था होत असले तर, सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे.
सोमवार पर्यत कामावर गेल्या मंगळवार पासून तब्येत बरी नाही म्हणून गेल्या नाहीत. मंगळवारपासून स्थानिक डॉक्टर कडून उपचार घेतले व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या खचल्या त्यात उपचार मिळण्यास काहीही कारण नसताना उशीर झाला, वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता - राजेंद्र पद्मन, मृताचे नातेवाईक.