CoronaVirus ठाण्यात पॉझिटिव्ह महिलेची डिलिव्हरी; मायलेकांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 06:34 PM2020-05-09T18:34:24+5:302020-05-09T18:34:58+5:30

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलेची दुसरी डिलिव्हरी 

CoronaVirus Delivery of Covid 19 Positive Woman in Thane | CoronaVirus ठाण्यात पॉझिटिव्ह महिलेची डिलिव्हरी; मायलेकांची प्रकृती स्थिर

CoronaVirus ठाण्यात पॉझिटिव्ह महिलेची डिलिव्हरी; मायलेकांची प्रकृती स्थिर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन (शस्त्रक्रिया) डिलिव्हरीची घटना ताजी असताना, शनिवारी पहाटे आणखी एका कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून या महिलेने 3.5 किलो वजनाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्या मायलेकांची प्रकृती स्थिर असून त्या नवजात बालकाचा लवकर स्वॅब घेण्यात येईल अशी माहिती त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
          गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कल्याण येथील 25 वर्षीय कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन डिलिव्हरी केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तसेच बुधवारी कोविड 19 पॉझिटिव्ह म्हणून ठाण्याच्या इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या एका 27 वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले होते. त्यातच ती गर्भवती असल्याने डॉक्टरांकडून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. अचानक शनिवारी पहाटे त्या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या.त्यानुसार त्या महिलेला डिलिव्हरीसाठी वॉर्डात घेतल्यावर तिची पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ही कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची दुसरी जिल्ह्यातील डिलिव्हरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. डिलिव्हरीनंतर त्या दोन्ही बालकांना मातेचे स्तनपान सुरू केले असून पहिल्या जन्माला आलेल्या मुलीची कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतला असून आज जन्माला आलेल्या बालकाचा स्वॅब लवकरच घेतला जाईल असे डॉक्टरांनी सांगितले. तर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार आणि फिजिशियन डॉ.नेताजी मुळीक,डॉ सृजित शिंदे,डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.अर्चना आखाडे यांनी ही डिलिव्हरी केलीअसून यावेळी डॉ शोभना चव्हाण,डॉ. प्रसाद भंडारी, परिचारिका शबनम शिंदे,मिलिंद पवार,सुखदा वैश्यपायन,मुमताज शेख,मेधा जबडे आदी उपस्थित होत्या. 


प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता ओळखून रुग्णालयात त्याप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी दुसरी डिलिव्हरी करण्यात आली असून बाळ-बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे.तसेच ही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलेची ही दुसऱ्या डिलिव्हरी असून ती डिलिव्हरी नॉर्मल केली आहे.
-डॉ.कैलाश पवार,जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे. 

Web Title: CoronaVirus Delivery of Covid 19 Positive Woman in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.