Coronavirus: लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:14 PM2020-04-14T15:14:23+5:302020-04-14T15:15:45+5:30

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येही हाती काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती.

Coronavirus: due to Increased lockdown Thousands of people marched on the streets in Mumbra pnm | Coronavirus: लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला

Coronavirus: लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला

Next
ठळक मुद्देदेशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णयहजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने आक्रोश

ठाणे – कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनबाबत घोषणा करुन देशातील नागरिकांना पुढील काही दिवस संयमाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करा अशाप्रकारे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे.

मात्र या लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातूनच मुंब्रा परिसरात देवरीपाडा येथे मोठ्या संख्येने मजूर एकत्र जमले. रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांचे हाल होत असल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला घरी पाठवा अन्यथा पगार द्या अशी मागणी करत रस्त्यावर जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली. मजुरांचा जमाव पाहून याठिकाणी पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली त्यानंतर या मजुरांमध्ये आक्रोश निर्माण झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं असलं तरी यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही कोरोनापेक्षा उपासमारीने मरू अशा शब्दात मजुरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येही हाती काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. सूरत येथील डायमंड बुर्समध्ये बांधकाम मजूर आणि लसकाणामध्ये सूतगिरणी कामगार रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन सुरु राहिले, तर राहायचे कसे, असा सवाल करत एकतर काम सुरु करा किंवा घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी या कामगारांनी केली. यावेळी सूतगिरणी कामगारांनी भाजीच्या पाच गाड्यांना आग लावली. तसेच रुग्णवाहिका आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती.

देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.

Web Title: Coronavirus: due to Increased lockdown Thousands of people marched on the streets in Mumbra pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.