coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:28 PM2020-04-23T17:28:57+5:302020-04-23T17:38:30+5:30

व्यवस्थापनाने गोडावून बंद असल्यामुळे हाकलवुन लावल्याने पायी पायी आपल्या प्रांतात निघालेले 4 मजूर  कसारा घाटातील उंट दरीत अडकले होते

coronavirus: four worker rascue from jungel | coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका

coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका

googlenewsNext

- शाम धुमाळ
कसारा  - भिवंडी ( वडपा )येथील एका  गोडावूनमध्ये कामाला असणाऱ्या कामगारांना तेथील व्यवस्थापनाने गोडावून बंद असल्यामुळे हाकलवुन लावल्याने पायी पायी आपल्या प्रांतात निघालेले 4 मजूर  कसारा घाटातील उंट दरीत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल 8 तास अथक परिश्रम करावे लागले. 

  लोकडाऊन मुळे अनेक परप्रांतीय मजूर  मुबंई, ठाणे, कल्याण सह विविध ठिकाणाहून पायी पायी आपल्या प्रांतात निघाले आहेत अनेक मजुरांची शासनाने सोय केल्यानंतर देखील ह्या मजुरांना त्यांचे घरमालक, कंपनी ठेकेदार, यांनी हाकलल्यामुळे दररोज शेकडो लोक पायी जात आहेत. रस्त्यावर पोलीस असल्याने काही जण डोंगर, दरीतून पायवाट काढत प्रवास करीत आहेत. असाच प्रवास भिवंडी तील गोडावून ला कामाला असणारे 1)नरेंद्र चौधरी  2)भूपाल निसार 3)
राजेश कोल 4)फुलचंद रावत. हे मजूर पायी प्रवास करीत असताना त्यांनी महामार्गावर लतिफ़वाडी व कसारा घाट माथ्यावर पोलीसांचे चेक पोस्ट असल्याने त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग वरील चिंतामण वाडी येथून डोंगरी मार्ग अवलंबला 12/13 किलो मीटर चालल्या नंतर ते दुपारी 3 च्या सुमारास उंट दरीच्या जंगलात भरकटले 1600 फूट खोल व घनदाट झाडी असलेल्या दरीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात रात्र झाली पण काही रस्ता भेटत नसल्याने अडकल्या पैकी एकाने 100 नंबर वर फोन करून पोलीसांकडे मदत मागितली तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते त्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, psi महाले, psi खतीब व  पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन टिम शहापूर या व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी  विविध डोंगर कठडे व  परिसरात शोध घेतला पण मिळून येत नसल्याने त्यांचे मोबाईल ट्रॅक करून लोकेशन काढले असता ते उंटदरीत अडकल्याचा अंदाज व्यक्त केला. अडकलेल्या पैकी एकाशी मोबाईल वर संभाषण सुरु होते साहेब हमे बचाव असा ओरडा करत होते कसारा घाट घाटनदेवी मंदिरा समोरील एका टेकडी वरून दरीत मोबाईल लाईट दिसली या नंतर पोलीस कर्मचारी रामदास राठोड  व आपत्ती व्यवस्थापन टिम मधील लक्ष्मण वाघ  काही सदस्य सावरवाडी (कसारा खुर्द )येथून उतरले तर कसारा घाट घाटनदेवी मंदिराकडून काही लोक मदतीला उतरले व  8 तासा नंतर ते मिळून आले. मदतीला असणारी टिम 1600 फूट खोल दरी चढ उतार करीत अडकलेल्या लोकांना वर आणल्या नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

 या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन टिम चे  शाम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, प्रथमेश पुरोहित, रवी देहाडे बबन जाधव स्वप्नील कलंत्री , मयूर गुप्ता व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: coronavirus: four worker rascue from jungel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.