coronavirus: मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना मोफत एसटी बससेवा, पायी जाणाऱ्यांना दिलासा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:58 AM2020-05-12T01:58:15+5:302020-05-12T02:00:41+5:30

लॉकडाउनमुळे परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि अन्य अडकून पडलेल्या नागरिकांवर लहान मुले, महिलांना घेऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच चालत गाठण्याची वेळ आली आहे. या लोकांसाठी राज्य शासनाने एसटी बस राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडल्या आहेत.

coronavirus: Free ST bus service to laborers up to Madhya Pradesh border | coronavirus: मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना मोफत एसटी बससेवा, पायी जाणाऱ्यांना दिलासा  

coronavirus: मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना मोफत एसटी बससेवा, पायी जाणाऱ्यांना दिलासा  

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर, मुंबईहून उत्तर भारतात पायी जाणाºया मजूर, कामगारांना राज्य शासनाच्या एसटी बस सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळपासून मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील अन्य राज्यांच्या हद्दीवरही प्रवाशांच्या संख्येनुसार ही सेवा देण्यात येणार आहे.

लॉकडाउनमुळे परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि अन्य अडकून पडलेल्या नागरिकांवर लहान मुले, महिलांना घेऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच चालत गाठण्याची वेळ आली आहे. या लोकांसाठी राज्य शासनाने एसटी बस राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडल्या आहेत.
मीरा-भार्इंदर हद्दीतून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पायी चालणाºया मजुरांना शासनाच्या वतीने वरसावे नाका येथे फाउंटन हॉटेलजवळ मोफत एसटी बसची सुविधा सोमवारपासून सुरू केली आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांना घेऊन बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना सोडून येत आहे. सकाळी बस सोडतेवेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, अप्पर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक संदीप कदम, तलाठी रोहन वैष्णव व अन्य पोलीस कर्मचारी, डॉक्टर आदी उपस्थित होते. याठिकाणी वैद्यकीय तपासणी व नोंदणीही केली जात आहे. तसेच, बसमधून जाणाºया प्रवाशांना जेवणाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, केळी आदी दिले जात आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार मध्य प्रदेश, गुजरात व अन्य राज्याच्या सीमेपर्यंत या मजुरांना नेण्यात येणार आहे.

जव्हार येथून १७५ मजूर बसने रवाना
जव्हार : लॉकडाउन काळात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची जय्यत तयारी सुरू असून जव्हार येथून १७५ मजुरांना एसटी महामंडळाच्या बसने शासनामार्फत मोफत विविध राज्यांत सोमवारी दुपारी सोडण्यात आले.

जव्हार तालुक्यातील बोईसर, तारापूर एमआयडीसी व इतर ठिकाणांहून आलेले परप्रांतीय मजूर जव्हारमार्गे गावी चालत चालले होते. अशा मजुरांना मागील १३ दिवसांपासून जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठान व राधा विद्यालय येथे राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली होती. त्यांना रोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण देण्यात येत होते.

उत्तर प्रदेशातील २४, बिहार येथील दोन अशा २६ मजुरांना पालघर येथून रेल्वेद्वारे घरी पाठविण्यात आले, तर यवतमाळ जिल्ह्यातील २१ मजूर, मध्य प्रदेशातील १३० मजुरांना मध्य प्रदेशच्या हद्दीपर्यंत एकूण आठ एसटीद्वारे सोमवारी मोफत सोडण्यात आले. दरम्यान, या मजुरांना गेले काही दिवस सलग खाण्याची व राहण्याची व मोफत बसची सोय केल्याबाबत मजुरांनी समाधान व्यक्तकेले. या वेळी सहायक जिल्हाधिकारी प्रजित नायर, जव्हार तहसीलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी समीर वठारकर, नायब तहसीलदार धर्मराज पाटील, मंडळ अधिकारी देशमुख व सर्व तलाठी जव्हार बस परिवहन प्रमुख सरिता पाटील, सटाणेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: coronavirus: Free ST bus service to laborers up to Madhya Pradesh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.