coronavirus : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई कीट घालून कोरोनाबाधित शिवसैनिकाची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 10:34 PM2020-08-21T22:34:18+5:302020-08-21T22:34:57+5:30
कल्याण डोंबिवलीचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी हे कोरोना बाधित असून तो कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार घेत आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवलीचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी हे कोरोना बाधित असून तो कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची आज सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई कीट घालून भेट घेतली. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी साळवी यांना बरे होणार तु्म्ही लवकर, खूप लोक बरे झाले. आजार कोणाला सोडत नाही. त्यामुळे टेन्शन घेऊन का व्हील पॉवर स्ट्राँग ठेवा असा धीर देत साळवी यांचे मनोबल वाढविले. उपचारासाठी दुस:या रुग्णालयात हलविण्याची गरज आहे का असेही साळवी यांना विचारले. कल्याणमध्ये कोरोनी लढा देताना फ्रंट लाईनवर काम करणारे शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन सदस्य नाना यशवंतराव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे काळजीपोटी शिंदे यांनी मिरा रुग्णालयात धाव घेऊन साळवी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.