Coronavirus: पगारासाठी पैसे नसल्यानं होमगार्डची सेवा स्थगित; पोलिसांवरचा ताण वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:58 AM2020-05-07T05:58:27+5:302020-05-07T07:15:39+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांच्या मदतीला ५०० होमगार्ड पाठवले होते.यापैकी ४३५ होमगार्ड ठाणे शहर पोलिसांना मिळाले होते.
ठाणे : कोरोनाविरूद्धच्या लढाईत ठाणे शहर व ग्रामिण पोलीस दलासोबत लढण्यासाठी होमगार्ड फौज आली होती. मात्र, तब्बल ३८ दिवसांची सेवा बजावल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील या सर्व होमगार्डसची सेवा स्थगित केल्याचे आदेश जिल्हा समादेशक यांनी दिले आहेत. या होमगार्डची सेवा स्थगित केल्याने कमी होणाऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर आता कळत नकळत ताण वाढणार आहे. त्यातच होमगार्डची सेवा त्यांना पगार देण्यास पैसे नसल्याने स्थगित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस दलात सात ते आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज आहे. ती ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यापैकी २५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून यातील काही पोलीस अधिकारी कोरोनावर मात करत पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर या लढाईत लढताना १५० च्या आसपास पोलिसांना संस्थात्मक आणि होम क्व ारंटाइन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांच्या मदतीला ५०० होमगार्ड पाठवले होते.यापैकी ४३५ होमगार्ड ठाणे शहर पोलिसांना मिळाले होते. ते कर्तव्यावर हजर झाल्याने त्यांचे मानधन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन निधीतून अदा करण्यात येणार आहे. मात्र, तब्बल ३८ दिवसांची सेवा बजावल्यानंतर या होमगार्डचा ठाणे ग्रामीण, नवी मुंबई ,ठाणे शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील कोरोना बंदोबस्त ३ मे पासून स्थगित केला आहे. तसे आदेशच ठाणे जिल्हा समादेशक यांनी काढले आहेत.
शहर पोलीस दलाला ५०० होमगार्ड मंजूर झाले होते. त्यातील ४३५ होमगार्ड मिळाले होते. ते आता परतले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच पोलिसांवर ताण येणार आहे. या लढाईत लढणाºया पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. तर, काही जणांना संस्थात्मक तर काहींना होम क्वारंटाइन व्हावे लागले आहे. होमगार्डपैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे शहर (विशेष शाखा)