CoronaVirus कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचे हॉटस्पॉट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:36 PM2020-04-19T14:36:30+5:302020-04-19T14:36:57+5:30
महापालिका हद्दीतील एकूण 122 प्रभागांपैकी 20 प्रभागात कोरोनाची लागण झालेले 73 रुग्ण आढळून आले.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कालर्पयतच्या तारखेत एकूण 73 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहे. कोराना बाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता महापालिका आयुक्तांनी हॉटस्पॉट असलेले प्रभाग जाहिर केले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूव्रेतील म्हात्रेनगर, आायरेगाव, तुकारामनगर, छेडारोड, डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर, टेलकोस वाडी, कल्याण पूव्रेतील चिंचपाडा, भगवानगर आणि कल्याण पश्चिमेतील खडकपाडा वायलेनगर हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट असलेले प्रभाग आहे.
महापालिका हद्दीतील एकूण 122 प्रभागांपैकी 20 प्रभागात कोरोनाची लागण झालेले 73 रुग्ण आढळून आले. उर्वरीत 102 प्रभागात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. ही 102 प्रभागासाठी समाधानकारक बाब आहे. ज्या 20 प्रभागात कोरोनाचे रुग्ण मिळून आले. त्यामध्ये गांधारे, टिटवाळा मंदिर परिसर, शहाड, फ्लॉव्हर व्हॅली, चिकनघर, ठाकूरवाडी, गावदेवी नवापाडा, कोपर रोड, जुनी डोंबिवली, कोपर, म्हात्रेनगर, सारस्वत कॉलनी, तुकारानगर, आंबिकानगर, नेहरुनगर, जाईबाई विद्यालय, सागाव सोनारपाडा, विजयनगर, तिसगांव नाका यांचा समावेश आहे.
20 प्रभागातील लोकांनी बाहेर पडणो टाळले तर कोरोनाचा संसर्ग रोखता येणो शक्य असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. विशेषत: तरुण तरुणी गाडी घेऊन बाहेर फिरताना दिसत आहेत. गरज नसताना ही मंडळी घरी राहण्याऐवजी बाहेर फिरून घरांच्या मंडळीसह प्रभागातील अन्य नागरीकांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे 20 प्रभागातील नागरीकांनी काटेकोर नियमांचे पालन केल्यास कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ शकते असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.