Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २३०१ कोरोना रुग्णांची वाढ; ५० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:10 PM2021-05-06T22:10:58+5:302021-05-06T22:12:04+5:30
Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.
ठाणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.
ठाणे शहर परिसरात ६०१ रुग्ण आढळले असून आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णांची संख्या आता एक लाख २२ हजार ७९३ तर मृतांची संख्या एक हजार ७२५ नोंदली गेली आहे. कल्याण डोंबिवलीत ५८४ नव्याने वाढ होऊन १२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. या मनपा क्षेत्रात एक लाख २४ हजार ७१३ रुग्णांस एक हजार ४९८ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये ४२ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आजपर्यंत १९ हजार २३९ रुग्णांची व ४४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात ३९ रुग्णांची वाढ व एक मृत्यू झाला. आतापर्यंत या शहरातल्या हजार दोन रुग्णांची आणि ४०१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातही आज २५४ रुग्णांच्या वाढीसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ४५ हजार ३०० रुग्णांची व एक हजार ८६ मृत्यूची नोंद झाली आहे.
अंबरनाथ शहरात १०१ रुग्ण वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील आतापर्यंत १८ हजार २८५ रुग्ण संख्येसह ३९० मृतांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूर परिसरात ११२ बाधीत व एक मृत्यू नोंद झाला आहे. आतापर्यंत १९ हजार २९४ बाधीत व २०२ मृत्यू या शहरात झालेले आहेत. जिल्ह्यातील गांवपाड्यात आजही ३२० बाधीत आढळले असून सात मृत्यू झाले आहेत. यामुळे आजपर्यंत येथील २८ हजार ४५९ बाधीत व ७१८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.