Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ; ११ मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:20 PM2021-07-12T20:20:26+5:302021-07-12T20:21:01+5:30

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत ३५४ जणांची सोमवारी वाढ झाली असून ११ रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३८ हजार १३५ रूग्णांसह मृतांची संख्या दहा हजार ८५४ नोंदली गेली आहे.

Coronavirus: An increase of 354 coronavirus patients in Thane district; 11 deaths | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ; ११ मृत्यू 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ३५४ रुग्णांची वाढ; ११ मृत्यू 

Next

ठाणे : जिल्ह्यातील रुग्ण संख्येत ३५४ जणांची सोमवारी वाढ झाली असून ११ रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३८ हजार १३५ रूग्णांसह मृतांची संख्या दहा हजार ८५४ नोंदली गेली आहे.

ठाणे परिसरात ५८ रुग्ण आढळून आले. यासह येथील रुग्ण संख्या एक लाख ३४ हजार ४६९ झाली. या शहरात तीन बाधीत दगावल्याने मृतांची संख्या दोन हजार ४० झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात ९७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या एक लाख ३७ हजार ६२८ झाली. दिवसभरात मृत्यू नाही. आतापर्यंत दोन हजार ६५० मृत्यू नोंदवण्यात आले आहे.

उल्हासनगरला सात रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्ण संख्या २० हजार ८९० झाली असून ५२८ मृतांची संख्या नोंदली आहे. भिवंडीला दिवसभरात चार रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण १० हजार ६६० झाले असून मृत्यू ४६६ नोंदली. मीरा भाईंदरला ५२ रुग्णांची वाढ होऊन एक मृतांची आहे. आता येथील रुग्ण संख्या ५१ हजार १४० झाली असून एक हजार ३४४ मृतांची नोंद आहे.

अंबरनाथला १२ रुग्णांच्या वाढी झाली. मात्र आज एक मृत्यू आहे. येथील रुग्ण संख्या आता १९ हजार ९१८ झाली असून ५१९ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली आहे. आज एकही मृत्यू आहे. आता येथील २१ हजार ३६१ रुग्णांसह ३५० मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ३३ रुग्ण आढळून असून एकही मृत्यू नाही. या परिसरात आजपर्यंत ३९ हजार ९३४ रुग्णांची वाढ होऊन एक हजार १९५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Coronavirus: An increase of 354 coronavirus patients in Thane district; 11 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.