Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१९२ रुग्णांची वाढ; ४६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:04 PM2021-04-24T22:04:59+5:302021-04-24T22:05:52+5:30
ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे पाच हजार १९२ रुग्णांची वाढ शनिवारी झाली असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांसह मृतांच्या संख्येत ही काही अंशी घट झाल्याचे आज उघड झाले आहे. जिल्ह्यात आता चार लाख ४६ हजार ३७६ रुग्णांसह सात हजार २३२ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.
ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे. शहरात आज आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ६०३ नोंदल्या गेली आहे. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ८९९ रुग्णांची आज वाढ झाली असून ११ मृत्यू झाले आहे. आतापर्यंत एक लाख १५ हजार ५० रुग्ण बाधीत असून एक हजार ३७५ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये १२६ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १८ हजार १६२ झाली असून ४०९ मृतांची संख्या आहे. भिवंडीला ६७ बाधीत आढळून आले असून दोन मृत्यू आहे. आता बाधीत नऊ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३८९ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५१८ रुग्ण आढळले असून न ऊ मृत्यू आहे.या शहरात बाधितांची संख्या ४० हजार ९५५ असून मृतांची संख्या ९७४ नोंदली.
अंबरनाथला २११ ग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत १६ हजार ८७१ असून मृत्यू ३३५१ आहेत. बदलापूरमध्ये १९४ रुग्णांची नों द झाल्यामुळे बाधीत १७ हजार ५५१ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १५७ आहे. ग्रामीणमध्ये ४८९ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले. आता बाधीत २५ हजार १६ आणि आतापर्यंत ६५९ मृत्यू झाले आहेत.