CoronaVirus जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण? आनंद परांजपे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:17 PM2020-04-14T13:17:14+5:302020-04-14T13:18:34+5:30
आव्हाडांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आधीपासूनच औषधे, आहार घेत होते. तसेच सोबतच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनाही देत होते. होमिओपथीच्या रेग्युलर गोळ्याही घेत होते, असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला होता.
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा खळबळजनक दावा ठाण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला होता. याचबरोबर तीन दिवसांनी दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचेही पाटील म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी याचे खंडण केले आहे.
पाटील यांनी हा दावा करताना लोकमत प्रतिनिधीला सांगितले की, आव्हाडांनी डॉक्टरांकडे उपचार घेतले. आव्हाडांसह आपणही आधीपासून अँटीबायोटीक गोळ्या घेत होतो. आव्हाडांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आधीपासूनच औषधे, आहार घेत होते. तसेच सोबतच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनाही देत होते. होमिओपथीच्या रेग्युलर गोळ्याही घेत होते. यामुळे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तीन दिवसांतच आव्हाडांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा त्यांनी केला आहे. डॉक्टरांना कीट आणून देणे, सॅनिटायझर संपले किंवा अन्य काही संपले तर ते आणून देणे आदी गोष्टी सुरू होत्या. यामुळे कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
यावर परांजपे यांनी या अफवा पसरविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. जितेंद्र आव्हाडांची शुक्रवारी एकच चाचणी करण्यात आली आहे. रविवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यामुळे ठाणेकरांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन परांजपे यांनी केली आहे. आव्हाड गेले काही दिवस जनतेच्या सेवेसाठी सर्व प्रकारची काळजी घेत काम करत होते. मात्र, त्यांच्या सोबत असलेले पोलीस अधिकारी आणि अन्य लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे ते होम क्वारंटाईन झाले आहेत, असेही परांजपे यांनी सांगत त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाचा दावा खोडून काढला आहे.
धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश
धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप
शिवभोजन थाळीला नितेश राणे देणार टक्कर; विनामुल्य 'कमळ' थाळीची घोषणा