CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 9 नवे रुग्ण; चार पोलिसांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:14 PM2020-05-06T16:14:10+5:302020-05-06T16:14:36+5:30
एकूण रुग्णसंख्या झाली 233
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 9 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यात मुंबईत कार्यरत असलेल्या चार पोलिसांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत एकूण रुग्णांची संख्या 233 झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील 43 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, कल्याण पूव्रेतील 34 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झालेली आहे. हे तिन्ही पोलिस मुंबईत कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबईत वाहतूक शाखेत काम करणाऱ्या 37 वर्षीय पोलिसाही लागण झाली आहे. ते कल्याण पूर्वेत राहतात. कल्याण पूर्वेतील 28 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. ती मुंबईतील सरकारी सेवेत सुरक्षा रक्षकाचे काम करते. ठाणे येथील खाजगी कंपनीत कामाला असलेल्या 32 वर्षी तरुणाला व म्हात्रे येथील 33 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. हे दोघेही कल्याण पूव्रेत राहतात. याशिवाय कल्याण पश्चिमेतील 44 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. हे कोरोनाचे नवे रुग्ण आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 76 जणांना ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत 154 रुग्ण हे कोरोनाचा उपचार घेत आहेत.