Coronavirus in Kalyan: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २७ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २८०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:49 AM2020-05-09T02:49:41+5:302020-05-09T02:49:51+5:30
नव्या रुग्णांमध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाची लागण झालेले २७ नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसाचा समावेश आहे. या रुग्णांसह महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २८० झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील ६९ वर्षीय वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला, तसेच कल्याण पूर्व व पश्चिमेतील दोन आणि डोंबिवली पूर्व पश्चिमेतील दोन वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. यापैकी तीन महिला मुंबईतील सरकारी रुग्णालयातील, एक ठाण्यातील खाजगी रुग्णालयात काम करते. कल्याण पूर्वेतील तीन सरकारी कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले, तर दोन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एक पोलीस हा कल्याण पश्चिमेत तर दुसरा कल्याण पूर्वेत राहतो. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारीही कोरोनाबाधित झाला आहे. कल्याण पूर्वेतील सरकारी सेवेतील सुरक्षारक्षकालाही कोरोना झाला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महिला लॅब टेक्निशियन, तसेच गुजरात येथील खाजगी कंपनीत काम करणारा आणि डोंबिवलीत राहणाºया व्यक्तीलाही कोरोना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील महिला फार्मासिस्ट, पूर्वेतील वाशी येथे काम करणारा कर्मचारी, डोंबिवली पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. डोंबिवली पूर्वेतील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी एकाला लागण झाली आहे.कल्याण पश्चिमेतील चार जणांना कोरोनाबाधितांच्या संपर्कातून संसर्ग झाला आहे. कल्याण पश्चिमेतील दोन विद्यार्थ्यानाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याबाबतचा पूर्वेतिहास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही.
२० रुग्ण पालिका हद्दीबाहेर काम करणारे
नव्या आढळून आलेल्या २७ रुग्णांपैकी २० जण हे मुंबई, ठाणे, वाशी याठिकाणी काम करणारे आहेत. एक रुग्ण हा गुजरात येथून आलेला आहे. शहरातील केवळ सातच रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ७६ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २०० आहे.