coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:58 PM2020-04-08T17:58:46+5:302020-04-08T17:59:22+5:30

टिटवाळ्य़ात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता कोरोना टिटवाळ्य़ातही पोहोचला आहे.  

coronavirus : Kalyan-Dombivali Corona has 3 new patients, total number of coronary arteries at 38 vrd | coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर

Next

कल्याण- कल्याण-डोंबिवलीत आज कोरानाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एका शासकीय रुग्णालयात काम करणा-या आयांचा समावेश आहे. ही आया टिटवाळा परिसरात राहणारी आहे. अन्य दोन रुग्णांपैकी एक कल्याण पूर्वेतील व एक जण डोंबिवली पूर्वेतील आहे. 3 नवे रुग्ण आढळून आल्याने महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 38 झाली आहे. टिटवाळ्य़ात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता कोरोना टिटवाळ्य़ातही पोहोचला आहे.
 
टिटवाळ्य़ातील आया ही शासकीय रुग्णालयात कामाला आहे. 44 वर्षीय आयाला कोरोनाची लागण झाली आहे. टिटवाळ्य़ात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता टिटवाळ्य़ातही कोरोना पोहोचला आहे. महापालिकेची हद्द टिटवाळ्यापर्यंत आहे. टिटवाळा परिसर हा महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रंतर्गत येतो. या आया महिलेच्या संपर्कात अन्य कोणी आले असल्यास त्यालाही कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कल्याण पूर्वेतील 40 वर्षीय महिला ही कोरोनाबाधित रुग्णांच्या सान्निध्यात आल्याने व डोंबिवलीतील 38 वर्षीय रुग्ण हा डोंबिवलीतील लग्न सोहळ्य़ाशी संबंधित कोरोनाबाधित झाला आहे.

कोरोनामुळे यापूर्वी कल्याण व डोंबिवलीतील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 होती. नव्या तीन रुग्णांमुळे हा आकडा 38 च्या घरात पोहोचला आहे. यापूर्वीच्या 35 कोरोनाबाधितांपैकी सात जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील 27 गावातील निळजे परिसरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून होता. त्यापाठोपाठ टिटवाळ्य़ात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाने आत्ता शहर केंद्रीत दाट लोकवस्ती वगळता ग्रामीण भागातही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
-------

कोरोनाग्रस्तांच्या घरातील कचरा बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारक
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या घरातील कचरा, बेडसीट, वापरलेला मास्क हा बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर होम क्वॉरंटाइन झालेल्या रुग्णांच्या घरातील कचरा व ज्या सोसायटय़ा कोरोना रुग्णामुळे सील केल्या आहे. त्यातील कचरा जनरल कचरा व घंटा गाडय़ाकडे जमा न करतो तो बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारक आहे. हा कचरा बायोमेडिकल वेस्टला दिला नाही तर संबंधितांच्या विरोधात साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये कायेदशीर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचा उंबर्डे येथे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कार्यान्वित आहे.

Web Title: coronavirus : Kalyan-Dombivali Corona has 3 new patients, total number of coronary arteries at 38 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.