Coronavirus In Kalyan : कल्यण-डोंबिवलीत कडकडीत लॉकडाऊन, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:03 PM2020-07-02T16:03:47+5:302020-07-02T16:04:56+5:30

Coronavirus In Kalyan : लॉकडाऊन हा कोरोना रोखण्यासाठी करण्यात आला आहे. विनाकारण नागरीकांनी घराबाहेर पडून नये. पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी केले आहे.

Coronavirus In Kalyan : Strict lockdown in Kalyan-Dombivali, police keeping a close eye on rule breakers | Coronavirus In Kalyan : कल्यण-डोंबिवलीत कडकडीत लॉकडाऊन, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

Coronavirus In Kalyan : कल्यण-डोंबिवलीत कडकडीत लॉकडाऊन, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

googlenewsNext
ठळक मुद्देनियम मोडणाऱ्या अनेक दुचाकी चालकांच्या चाव्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सगळया प्रकराची दुकाने बंद ठेवण्यात होती.

कल्याण - कल्याणडोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आजपासून 12 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. नियम मोडणाऱ्या अनेक दुचाकी चालकांच्या चाव्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.


शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सगळया प्रकराची दुकाने बंद ठेवण्यात होती. मेडिकल स्टोअर, दूध डेअरीत ग्राहक अत्यंत तूरळक प्रमाणात दिसून आले. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत, असे पोलिसांकडून रिक्षा फिरवून आवाहन केले जात आहे. दुचाकीवरुन डबलसीट प्रवास करणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच काही दुचाकी चालकांच्या चाव्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहराच्या एंन्ट्री पॉईंटवरील नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शहरात बाहेरच्या शहरातील गाडय़ांना प्रवेश नाकारल्याने शिळ फाटा, दुर्गाडी पूलावरुन काही वाहने परत पिटाळून लावण्याची कारवाई केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते पुन्हा बांबू बांधून सील करण्यात आलेले आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. काही ठिकाणी राज्य राखीव पोलिस तैनात आहे. त्यांच्यकडून कसून चौकशी केली जात आहे. लॉकडाऊन हा कोरोना रोखण्यासाठी करण्यात आला आहे. विनाकारण नागरीकांनी घराबाहेर पडून नये. पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी केले आहे.

सभापतींची उद्घोषणा
कल्याण डोेंबिवली महापलिकेतील स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी आज सकाळी डोंबिवली पश्चिम परिसरात स्वत: माईक घेऊन नागरीकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन केले. कोरोनावर मात करुन शहर कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनाने केलेला लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करण्यास नागरीकांनी साथ दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

Web Title: Coronavirus In Kalyan : Strict lockdown in Kalyan-Dombivali, police keeping a close eye on rule breakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.