coronavirus : संचारबंदीलाही लोक जुमानेनात; समजावण्यासाठी महापौर उतरल्या रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:55 PM2020-03-24T12:55:08+5:302020-03-24T12:55:49+5:30
कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान ...
कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान व भाजीपाला विक्री केंद्रात एकच गर्दी करीत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आज रस्त्यावर उतरल्या. त्यांनी लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. त्यामुळे यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे मनोधर्ये वाढण्यास मदत झाली.
जीवनावश्यक वस्तूंचा तूटवडा होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी खरेदीच्या नावाखाली एकाच दुकानात एकाच ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन राणे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे हे देखील त्यांच्यासोबत होते. सकाळी 9 वाजल्यापासून महापौर राणो या बाहेर पडल्या होत्या. त्यांनी डोंबिवली पश्चीम व पूर्व भागात रस्त्यावर फिरून नागरीकांना आवाहन केले. त्याचबरोबर कल्याण पूर्व पश्चिमेत त्यांनी त्यांचा आवाहन दौरा दुपार्पयत सुरु ठेवला होता.
दुपारनंतर वर्दळ कमी झाली होती. महापौर राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करुन भाजीपाल्याची गाडी फिरती ठेवल्यास एकाच ठिकाणी नागरीकांची भाजी खरेदीसाठी गर्दी होणार नाही अशी सूचना केली आहे. त्यानुसार सोय करण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.