CoronaVirus: 'त्या' वादग्रस्त लग्नातील हजेरीनंतर कल्याण डोंबिवलीच्या महापौर होम क्वॉरेंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:43 PM2020-03-28T23:43:59+5:302020-03-28T23:44:52+5:30
पुढील 14 दिवस घरीच राहणार; लग्नातील उपस्थिती ठरली होती वादग्रस्त
कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे या होम क्वॉरेंटाईन झालेल्या आहेत. त्यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या वादग्रस्त लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून होम क्वॉरेंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. 14 दिवस त्या घरीच राहणार आहेत.
महापौर राणे या जुनी डोंबिवली परिसरातील नेमाडे गल्ली परिसरात राहतात. या परिसरात पार पडलेल्या लग्न सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:ची काळजी घेतली होती. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून राणे यांनी स्वत:ला होम क्वॉरेंटाईन केले आहे. या वृत्ताला त्यांचे पती व शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुजोरा दिला आहे.
विनिता राणे उपस्थित राहिलेल्या लग्न सभारंभात परदेशातून आलेला तरुण सहभागी झाला होता. कोरोना असताना त्याने सहभाग घेतला असा मेसज त्याने टाकला होता. हे लग्न काँग्रेसशी संबंधित एका माजी पदाधिकारी महिलेच्या नातेवाईकाचे होते. त्याच लग्नात महापौरांनी हजेरी लावली. लग्न त्यांच्या परिसरात जुनी डोंबिवलीत असल्याने जाणे भाग होते असे राणे यांच्याकडून सांगण्यात आले. या लग्नाचा व हळदीचा विषय वादग्रस्त ठरल्याने काळजी घेण्यासाठी महापौर होम क्वारंटाइन झालेल्या आहे.
दरम्यान महापौरांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी करु नये यासाठी रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन केले. मात्र त्यांचीच लग्न प्रसंगातील उपस्थिती वादग्रस्त ठरली. या लग्नास केवळ महापौरच नाही अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.