coronavirus: अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयास केडीएमसीचा दणका, परवाना केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:56 PM2020-08-21T20:56:55+5:302020-08-21T20:57:45+5:30

कोरोनाबाधित रुग्ण महिलेस जास्तीचे बिल आकारण्यात आले होते. या महिलेला पीपीई कीट व कोविड कच-याची विल्हेवाट लावण्याचेही बिल आकारले गेले होते. या महिलेला डिस्चार्ज दिला जात नव्हता.

coronavirus: KDMC strikes hospital for charging exorbitant bills, license revoked | coronavirus: अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयास केडीएमसीचा दणका, परवाना केला रद्द

coronavirus: अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयास केडीएमसीचा दणका, परवाना केला रद्द

Next

कल्याण - कोरोना रुग्णांवर केलेल्या उपचारापोटी जास्तीचे बिल आकारणा:या श्रीदेवी रुग्णालयास कल्याण डोंेबिवली महापालिकेने दणका दिला आहे. या रुग्णालयाचा परवाना 31 ऑगस्टर्पयत रद्द करण्यात आला आहे. मात्र त्याठिकाणी अन्य उपचार घेत असलेल्या रुग्णावर उपचार सुरु राहितील. नवे रुग्ण घेता येणार नाही. त्याचबरोबर डायलिसीस रुग्णावरील उपचार सुरु राहतील अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना बाधित रुग्ण महिलेस जास्तीचे बिल आकारण्यात आले होते. या महिलेला पीपीई कीट व कोविड कच-याची विल्हेवाट लावण्याचेही बिल आकारले गेले होते. या महिलेला डिस्चार्ज दिला जात नव्हता. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पीपीई कीट घालून महिला रुग्णास उचलून नेले हाते. तसेच रुग्णालय प्रशासनास जाब विचारला होता. तसेच रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडे गायकवाड यांनी केली होती. या नंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या प्रकरणी पालिकेने रुग्णालयास नोटिस पाठवून विचारणा केली होती. मात्र रुग्णालयाने त्याचे उत्तर दिले नाही.

या रुग्णालयाचा परवाना पालिकेने 31 ऑगस्टर्पयत रद्द केला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.  रुग्णास आकारलेले जास्तीचे पैसे परत केले नाही तर कारवाई कायम राहिल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रुग्णास १ लाख ७० हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यात सूट दिली. तरी देखील ते बिल एक लाख १० हजार रुपयांचे झाले होते. सूट दिल्यानंतरही बिलाची रक्कम सरकारी दरानुसार होत नसल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: coronavirus: KDMC strikes hospital for charging exorbitant bills, license revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.