coronavirus: खोपट एसटी डेपो अखेर सील, वाहतुकीवर परिणामाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:04 AM2020-07-08T02:04:41+5:302020-07-08T02:04:59+5:30
सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती.
ठाणे : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) ठाण्यातील वाहन परीक्षकांसह चालक व वाहक अशा ४३ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक १ हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ व ८ जुलै रोजी तो बंद राहणार असून या काळात तेथे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. यातूनच अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. डेपोतील विश्रांती कक्षातील अपुºया जागेमुळे सामाजिक अंतराचे पालन होणेही शक्य नव्हते. त्यामुळेच डेपो बंद ठेवून निर्जंतुकीकरण करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार डेपो बंद ठेवण्यात येणार आहे.
खोपट डेपोमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रालय सीएसटी या भागांतील रुग्णालय व इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणाºया प्रवाशांसाठी सेवा देण्याचे काम करीत आहे. आता या कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा डेपो सील करण्याची मागणी कर्मचाºयांनी करूनही एसटीकडून ठोस पावले उचलण्यात आली नाही. ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी तो सील करण्याचे आदेश दिले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी या डेपोतून प्रतिदिन सकाळी ४० तर दुपारी ४० अशा ८० बस सोडण्यात येत होत्या. या कर्मचाºयांची गैरसोय टाळण्यासाठी खोपट बस डेपो क्र मांक दोन आणि इतर ठिकाणांहून किमान ४० बस सोडण्यावर भर देण्यात येणार आहे.
- विनोद भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी