ठाणे जिल्ह्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; नव्याने 182 रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:03 PM2020-05-10T22:03:24+5:302020-05-10T22:03:50+5:30
शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रविवारी ही ठाणे जिल्ह्यात 182 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ही 2,188 इतकी झाली असून रविवारी जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे. तसेच नवीमुंबईत रविवारी सर्वाधिक 82 रुग्ण नोंदवले गेले आहेत.तर अंबरनाथमध्ये एकाच नव्या रुग्णांची नोंद केली गेली आहे. तसेच ठामपातील रुग्णांनी सातशे आणि नवीमुंबईने साडेसहाशेचा टप्पा पार केला आहे. भिवंडीत पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.या नव्या रुग्णांमुळे नवीमुंबई ची रुग्ण संख्या 674 झाली आहे. त्याचबरोबर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ही 14 वर गेला आहे. त्यापाठोपाठ ठामपामध्ये 41नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 712 वर पोहोचली आहे. तसेच ठामपा हद्दीत ही दोघांचा मृत्यू झाला असून तेथील मृत संख्या 25 झाली आहे. केडीएमसी कार्यक्षेत्रात 16 रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्ण संख्या 321 झाली आहे.तसेच एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 17 नवे रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 94 झाली आहे. तर मिराभाईंदर मध्ये 14 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 256 वर गेली आहे. भिवंडी आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी 4 रुग्ण आढळून आले आहेत. तेथील अनुक्रमे रुग्ण 25 आणि 38 झाली आहे. मात्र भिवंडीत रविवारी पहिला कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे 3 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 54 झाली आहे.तर एक रुग्ण नव्याने सापडलेल्या अंबरनाथची रुग्ण संख्या 14 झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
रविवारी जिल्हा रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्ज
नव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केली आहे. त्यानुसार रविवारी ठाणे जिल्हा सामान्य (कोविड) रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्ज दिला आहे. यामध्ये ठामपामधील 15, मिराभाईंदर-4, ठाणे ग्रामीण-6, नवीमुंबई आणि वसई- विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.