coronavirus: बदलापूरमध्ये आजपासून कोविड रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:08 AM2020-05-14T02:08:53+5:302020-05-14T02:09:01+5:30

बदलापूर : बदलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर शहरातच उपचार करता यावे, यासाठी १०० खाटांचे रुग्णालय तयार करण्याचे काम ...

coronavirus: Kovid Hospital in Badlapur from today | coronavirus: बदलापूरमध्ये आजपासून कोविड रुग्णालय

coronavirus: बदलापूरमध्ये आजपासून कोविड रुग्णालय

Next

बदलापूर : बदलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर शहरातच उपचार करता यावे, यासाठी १०० खाटांचे रुग्णालय तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून उद्या, गुरुवारपासून रुग्णालयाची सुरुवात होणार आहे.
बदलापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या रुग्णांना ठाण्यात उपचारासाठी पाठवले जाते. मात्र ठाण्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता बदलापूर पालिकेने १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर पालिकेच्या बीएसयूपी योजनेतील रिकाम्या असलेल्या घरांमध्ये हे रुग्णालय सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ४० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री ही शिवसेनेच्या वतीने पुरवण्यात आली आहे. या रुग्णालयात डॉक्टरांची एक पथक तैनात केले आहे. पालिका प्रशासन आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधून बदलापूरमधील पहिले कोरोना रुग्णालय उभारण्यास गती मिळाली आहे. रुग्णांची संख्या वाढताच आणखी काही खाटा वाढविणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: coronavirus: Kovid Hospital in Badlapur from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.