CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कोरोना फायटरसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु करा, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:02 PM2020-04-30T19:02:44+5:302020-04-30T21:15:08+5:30
CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने ही शहरे रेड झोनमध्ये आहे.
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोना फायटर म्हणून कार्यरत आहे. ते ज्या ठिकाणी काम करीत आहे. त्याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यांच्या तपासणीकरीता ठिकठिकाणी तपासणी केंद्रे उभारली जावीत. त्याचबरोबर स्वतंत्र कोरोना रुग्णालय सुरु करण्याची मागणी कल्यण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने ही शहरे रेड झोनमध्ये आहे. या रेडझोनमध्ये सरकारी कर्मचारी, नर्स, पोलीस, डॉक्टर तसेच खाजगी रुग्णालयात काम करणारा स्टाफ आहे. जे नवे रुग्ण सापडत आहे. हे या कर्मचा-यांना कोरोना झाल्याने त्यांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले रुग्ण आहेत. नर्स, पत्रकार, पोलीस, डॉक्टर, खाजगी रुग्णालयात व सरकारी रुग्णालयात काम करणारा आरोग्य कर्मचारी हे सगळे कोरोना फायटर आहे. जे उपनगरात राहतात.
कल्याण डोंबिवली व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राहणारे कोरोना फायटर रोज मुंबईत कामानिमित्त जातात. अत्यावश्यक सेवा देत आहे. कोरोना फायटरना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल खचून कोरोनाची लढाई दुबळी ठरु शकते. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कोरोना फायटरची नोंद घेऊन. ते ज्या ठिकाणी काम करतात. त्याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या कुटुंबासह करावी. त्यांची दररोज तपासणी केली जावी. तसेच त्यांच्याकरीता स्वतंत्र कोरोना सुरु करावे. कोरोना फायटरचे आरोग्य सुरक्षित राहिले तर ते अन्य कोरोना रुग्णांना बरे करु शकतात. तेच जर कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले तर कोरोनाचा लढा लढणार कोण? याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.