CoronaVirus News in Thane : ठाण्यात 'या' ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी नाही, तळीरामांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:29 PM2020-05-04T20:29:25+5:302020-05-04T20:36:50+5:30

CoronaVirus Marathi News Updates in Thane : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे.

CoronaVirus Latest Marathi News in Thane wine shops closed in some area in thane SSS | CoronaVirus News in Thane : ठाण्यात 'या' ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी नाही, तळीरामांची निराशा

CoronaVirus News in Thane : ठाण्यात 'या' ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी नाही, तळीरामांची निराशा

googlenewsNext

ठाणे - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात काही भाग वगळता तुर्तास तरी वाईन शॉप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व आयुक्तांसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी (4 मे) बैठक झाली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यात काही भाग वगळता तुर्तास तरी वाईन शॉप उघडण्यास परवानगी द्यायला सर्व आयुक्तांनी नकार दिला आहे. ठाणे ग्रामीण भागात काही ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही.

शासनाने दारू विक्रीस परवागनी दिली असली तरी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रला परवानगी नाकारण्यात आली आहे.  त्यामुळे मद्य प्रेमींची निराशा झाली. भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने मद्य विक्रीला परवानगी मिळेल असे वाटत होते. सोमवारी शहराती इतर दुकाने सकाळी सुरू झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणेच बंद राहतील असे आदेशात म्हटले आहे.

दारुची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सोमवारी (4 मे) सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दुकाने उघडणार म्हणून तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याच दरम्यान दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तळीरामांना सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला आहे. अशातच लोकांना थांबवण्यासाठी शेवटी पोलिसांना यावं लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली; 11,706 जणांनी लढाई जिंकली

CoronaVirus News : धक्कादायक! एकामुळे तब्बल 55 कोरोना वॉरियर्सना कोरोनाची लागण, 'हे' आहे कारण

CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अ‍ॅप

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...

 

Web Title: CoronaVirus Latest Marathi News in Thane wine shops closed in some area in thane SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.