coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:29 AM2020-07-13T09:29:24+5:302020-07-13T09:30:04+5:30

खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.

coronavirus: Lockdown has increased, but the queues of Dombivlikars to go to work, how can Corona be stopped? | coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली2 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता, मात्र कोरोना बधितांची संख्या कमी होत नसल्याने ठाणे जिल्ह्यात अखेरीस 19 जुलै पर्यँत तो वाढवण्यात आला आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.

राज्य परिवहन मंडळाने जादा गाड्या मागवल्या असून वेळीच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सांगितले की, कामावर बोलावले आहे, मुंबई भागात लॉकडाऊन वाढलेला नाही, त्यामुळे सोमवारी हजर व्हायला सांगितले आहे, जावे लागणारच. रांग लावलेल्यामध्ये महिला, युवक, युवती, पुरुष आशा सगळ्या वयोगटतातले कामगार दिसून आले. 10 दिवसांनी रांगा लागल्याने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून येत होता.

पलावा, निळजे काटई येथील धोकादायक उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनचहलकाना दिलासा।मिळाला आहे. त्यामुळे त्या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचा दिलासा।मिळाला आहे. ठाणे, मंत्रालय, दादर या भागात तसेच  मुंबईतील शासकीय हॉस्पिटल मार्गावर राज्य परिवहन च्या बसेस सोडण्यात आल्या होत्या.

एवढ्या मोठ्या रांगा लागल्याने कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून रांगाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. हे कामगार मुबंईत जाणार तेथून पुन्हा येणार त्या प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी त्याना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.

Web Title: coronavirus: Lockdown has increased, but the queues of Dombivlikars to go to work, how can Corona be stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.