CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन लागू झाल्यास जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:55 AM2021-04-05T01:55:49+5:302021-04-05T01:55:56+5:30

निर्बंधांवर भर द्यावा : हाॅटेल व्यावसायिक

CoronaVirus Lockdown News: How to survive if lockdown is implemented? | CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन लागू झाल्यास जगायचे कसे?

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन लागू झाल्यास जगायचे कसे?

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : आधीच सलग सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा असाच लॉकडाऊन झाल्यास हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा कडक निर्बंध व्हावेत, अशी अपेक्षा ठाण्यातील हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी लॉकडाऊनबाबत आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या हॉटेल व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. रात्री आठनंतर ते बंद केले जातात. त्यामुळे आधीच हॉटेल व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सरसकट टाळेबंदीपेक्षा मास्क घातला नाही, सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर अशा लोकांवर जरूर कारवाई केली जावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २२ मार्च २०२० पासून हॉटेल, उपाहारगृह बंद ठेवले होते. सलग सात महिने ते बंद राहिल्यामुळे हॉटेल व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अनेक जण कर्जबाजारी झाले. काहींनी आत्महत्या केली. त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांचे हाल झाल्याच्या वेदना शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनची आवश्यकता आहे की नाही, यावर जाणकार मंडळीच भाष्य करू शकतील. पण लोकांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कोणाचाही रोजगार न बुडता निर्बंध आणले गेले पाहिजेत. तरीही लॉकडाऊन लादले गेल्यास उत्पन्नाचे साधनच बंद होऊ शकते. त्यामुळे मग जगायचे कसे, असाही यक्ष प्रश्न असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले. यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच हॉटेल मालक आणि चालक अशा सर्वांचेच हाल होण्याची भीतीही हे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. 

नियम कठोर करावेत 
लॉकडाऊन होऊ नये यासाठी काही अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी प्रशासनानेही मोठी मोहीम उघडली पाहिजे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नियम आणखी कडक केले जावेत, असा सल्लाही ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी यांनी दिला आहे.

Web Title: CoronaVirus Lockdown News: How to survive if lockdown is implemented?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.