CoronaVirus Lockdown News: ‘निर्बंध नव्हे, हे तर लॉकडाऊनच’; व्यापारी संघटनेचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:50 PM2021-04-06T23:50:31+5:302021-04-06T23:51:07+5:30

राज्यात लागू झालेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने गोड बोलून आम्हाला धोका दिल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

CoronaVirus Lockdown News: 'It's not a restriction, it's a lockdown' | CoronaVirus Lockdown News: ‘निर्बंध नव्हे, हे तर लॉकडाऊनच’; व्यापारी संघटनेचा आराेप

CoronaVirus Lockdown News: ‘निर्बंध नव्हे, हे तर लॉकडाऊनच’; व्यापारी संघटनेचा आराेप

googlenewsNext

अंबरनाथ : राज्यात लागू झालेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात अंबरनाथमधील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने गोड बोलून आम्हाला धोका दिल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कडक निर्बंधाच्या नावावर शासनाने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खांजी झाले यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या बैठकीत दुकाने रात्री आठपर्यंत सुरू राहतील, मात्र शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन असेल, असा निर्णय घेण्यात आला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडूनही अशाच प्रकारच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, मंगळवारी सकाळपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दुकाने अचानकपणे बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. सरकारने आधी वीकेंड लॉकडाऊन सांगितला, कडक निर्बंध सांगितले आणि नंतर अचानक गोड बोलून आम्हाला धोका दिला, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. याविरोधात बैठक घेऊन आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नेमके दुकाने सुरू ठेवायची की नाही, याबाबत प्रशासनामध्येच संभ्रम होता. त्यातच मंगळवारी अंबरनाथमध्ये नियमितप्रमाणे आपली दुकाने सुरू केली होती. मात्र, दुपारनंतर दुकाने बंद करण्यासाठी आली हाेती. 

फेरीवाल्यांकडून ‘ब्रेक द चेन’चा फज्जा
मीरा रोड : कोरोनाचा झपाट्याने संसर्ग पसरल्याने पुन्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ची अमलबजावणी सुरु झाली असली तरी शहरातील फेरीवाल्यांच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी पाहता कोरोना  उद्देशाचाच फज्जा उडाला आहे. गर्दीचा मुद्दा उपस्थित करतानाच काही दुकानदारांनी आंदोलन केले .

दुकाने अचानक बंद केल्याचा मुद्दा उपस्थित करत मंगळवारी काही दुकानदारांनी पालिका मुख्यालयाबाहेर संताप व्यक्त केला. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत दुकानदारांच्या समर्थनार्थ धाऊन गेले. यावेळी दुकानदारांनी काही काळ रस्तारोको केला. पालिकेने अचानक सोमवारी रात्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. 

Web Title: CoronaVirus Lockdown News: 'It's not a restriction, it's a lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.