CoronaVirus News: ठाणे रेल्वे तिकीट घरांसमोर लांबच लांब रांगा; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:32 PM2020-06-16T23:32:18+5:302020-06-16T23:32:24+5:30
आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाºयांसाठी लोकल सेवा सोमवारपासून सुरू
ठाणे : मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सोमवारी ही सेवा सुरू झाल्याचे प्रवाशांना कळताच, मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या तिकीटघरासमोर तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्यात आल्या होत्या. मात्र, या वेळी प्रवाशांकडून रांग लावताना सोशल डिस्टन्सचे नियम पाळले नसल्याचे दिसून आले.
आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाºयांसाठी लोकल सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी जास्त गर्दी नव्हती. मात्र मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थाकातील तिकीटघरासमोर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनी तिकिटासाठी रांग लावल्याचे दिसून आले. या वेळी रांगेत उभ्या असलेल्या कर्मचाºयांकडूनदेखील सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. रेल्वे प्रशासनाकडूनही तिकीटघरांसमोर तशी व्यवस्था करण्यात आली नाही. मर्यादित तिकीटघरे उघडल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत उभे राहावे लागत होते. याबाबत ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक मीना यांच्याशी संपर्क साधला असता, सोशल डिस्टन्सचे पालन करणे हे नागरिकांचे काम आहे. शासनाकडून वेळोवेळी याबाबत सूचना देण्यात येत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.