CoronaVirus News: स्मशानभूमींना कोरोनाचा विळखा; जवाहरबाग स्मशानभूमीतील दोघांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 01:41 AM2020-06-15T01:41:36+5:302020-06-15T01:42:05+5:30
प्रत्येक कर्मचाऱ्याची मोफत चाचणी करण्यासाठी आयुक्तांना साकडे
ठाणे : ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब शनिवारी उघड झाली. त्यामुळे या कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागत आहे. त्यांचे पीपीई किट तकलादू असून हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. त्यामुळे ठाण्यातील सर्वच स्मशानभूमींतील कर्मचाºयांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ठाणे शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जवाहरबाग स्मशानभूमीत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांपैकी ८० टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. या ठिकाणच्या कर्मचाºयांनाच या कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातूनच, आता येथील एका चालकासह अन्य एका कर्मचाºयाला शनिवारी कोरोनाची लागण झाल्याची बाब स्पष्ट झाली. याठिकाणी काम करणाºया कर्मचाºयाला त्रास होत असल्यामुळे त्याने दोन दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या सुरक्षारक्षकांना अद्यापही तुटपुंज्या साहित्यावरच काम करावे लागते. त्यांना दिलेल्या पीपीई किट तकलादू आहेत.
हॅण्डग्लोव्हजही लवकर जीर्ण होऊन फाटतात. सॅनिटायझर आणि साबणही त्यांना अपुºया प्रमाणात पुरविले जातात. कोरोनाग्रस्त कर्मचाºयांचे वेतनही ठेकेदाराकडून कपात केले जात आहे. या सर्वच कर्मचाºयांचे वेतन वेळेत आणि विनाकपात दिले जावे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेण्याच्या कालावधीमध्येही त्याला भरपगारी वैद्यकीय सुटी दिली जावी, अशी मागणीही या कर्मचाºयांकडून केली जात आहे.
जवाहरबाग स्मशानभूमीत कर्मचाºयांना दिलेल्या किटचा एका बाजूला ढिगारा पडलेला आहे. मागील दीड महिन्यापासून हा ढिगारा उचलला गेलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणाºया पावसामुळे आणखी कोणाला बाधा झाली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतील कर्मचाºयांची दर १५ दिवसांनी बदली केली जाते. परंतु, त्याचेही दुष्परिणाम होण्याची भीती आहे. बाधा झाल्याचे एखाद्याच्या लक्षातच आले नाही, त्याची अन्यत्र बदली झाल्यानंतर तो इतरांच्या संपर्कात आला, तर कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ शकतो, याकडेही काही कर्मचाºयांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप
ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसचे अध्यक्ष तथा ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून येथील कंत्राटी कर्मचाºयांना सुरक्षेचे कवच द्यावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
कर्मचाºयांना तत्काळ सुरक्षा साहित्य देण्याची मागणी
शहरातील प्रत्येक स्मशानभूमीमधील कर्मचाºयांची कोरोनाची तत्काळ मोफत चाचणी करावी. त्यांना हॅण्डग्लोव्हज, मास्क, किट आणि इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी उल्हासनगर येथील रहिवाशांनीही केल्या होत्या. त्यामुळे स्मशानभूमीतील धूर बाहेर फेकणाºया चिमण्या मोठ्या प्रमाणात असाव्यात, अशीही मागणी या पार्श्वभूमीवर होत आहे.