CoronaVirus in Thane धोक्याची घंटा! ठाणे जिल्ह्यात आज सर्वाधिक नवे रुग्ण; एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:33 PM2020-05-05T19:33:38+5:302020-05-05T19:37:33+5:30

जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा पोहोचला 1 हजार 397 वर तर मृताचा आकडा झाला 35 

CoronaVirus Marathi news 115 new patients in Thane district today; one died hrb | CoronaVirus in Thane धोक्याची घंटा! ठाणे जिल्ह्यात आज सर्वाधिक नवे रुग्ण; एकाचा मृत्यू 

CoronaVirus in Thane धोक्याची घंटा! ठाणे जिल्ह्यात आज सर्वाधिक नवे रुग्ण; एकाचा मृत्यू 

Next

ठाणे: जिल्ह्यात मागील दोन दिवस 90 च्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. परंतु एकाच दिवशी मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी शंभराचा आकडा पार केला. या 115 सापडलेल्या नव्या कोरोना बाधितांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ही एक हजार 397 इतकी झाली आहे. तसेच मंगळवारी नवीमुंबईत सर्वाधिक 46 रुग्ण मिळून आल्याने नवीमुंबईतील एकूण रुग्ण संख्या 394 झाली आहे. तर अंबरनाथ येथे एक नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.पण, ग्रामीण भागाची रुग्ण संख्या 50 वर पोहोचल्याने शहरीप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. त्यातच मिराभाईंदरमध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा 35 वर गेल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

 सोमवारी जिल्ह्यात 99 रूग्ण आढळुन आलेे होते. त्यापाठोपाठ मंगळवारी एकाच दिवशी 115 नवे रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या ही एक हजार 397 इतकी झाली आहे.  सर्वाधिक 46 रुग्ण नवीमुंबईत सापडल्याने तेथील एकूण संख्या 394 झाली आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत 39 रुग्ण आढळून आल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 451 वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवलीत ही 11 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या ही 224 झाली आहे. तर मिराभाईंदरमध्ये 8 रुग्ण आढळून आल्याने रुग्ण संख्या 189 इतकी झाली आहे. बदलापूर येथे मिळून आलेल्या 5 नव्या रुग्णांमुळे एकूण संख्या 42 वर गेली आहे. तर मिराभाईंदरमध्ये एकाच्या मृत्यू नोंद झाली आहे.

त्याचबरोबर, ठाणे ग्रामीण भागात ही तीन रुग्ण सापडल्याने येथील संख्या 50 वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये 2 रुग्ण आढळून आल्याने रुग्ण 16 झाली आहे. तर भिवंडीत एका रुग्णाची नोंद झाल्याने येथील संख्या 20 झाली आहे. तसेच एक ही रुग्ण न सापडणाऱ्या अंबरनाथची रुग्ण संख्या 11 इतकी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
 

महत्वाच्या बातम्या...

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

Web Title: CoronaVirus Marathi news 115 new patients in Thane district today; one died hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.