CoronaVirus News : भारीच! प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरुणांचा पुढाकार, रिक्षा सॅनिटायझेशन यंत्र केलं तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 07:15 PM2020-08-02T19:15:26+5:302020-08-02T19:20:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मेकॅनिकल इंजिनिअर मित्रांनी खास रिक्षा चालक व प्रवाशांना कोरोनाच्या संसर्गातून वाचण्याकरिता सॅनिटायझेशन रक्षा कवचयंत्र तयार केले आहे.
धीरज परब
मीरारोड - मीरारोडच्या विकास निकम व सूरज तेंडुलकर या दोन तरुण मेकॅनिकल इंजिनिअर मित्रांनी खास रिक्षा चालक व प्रवाशांना कोरोनाच्या संसर्गातून वाचण्याकरिता सॅनिटायझेशन रक्षा कवचयंत्र तयार केले आहे. या यंत्राचे बटण दाबताच मागील प्रवाशांची सीट आणि चालकाची सीट सॅनिटायझरचे फवारे उडून निर्जंतुकीकरण होते. मीरारोडमध्ये राहणारे निकम व तेंडुलकर हे मित्र असून एकत्रच इंटिरियरचा व्यवसाय करतात. त्यांचे घोडबंदर येथे वर्कशॉप आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दुसरीकडे शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. रोज रिक्षा चालवून स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांना रिक्षा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे चालक आणि प्रवासी घाबरत आहेत. अनेक चालकांनी प्रवासी व चालकाच्या दरम्यान प्लास्टिकचे पार्टिशन बसवले आहे. पण हात, सीट आदी सतत सॅनिटाईझ करणे शक्य होत नसल्याने निकम आणि तेंडुलकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत खास रिक्षा चालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे सॅनिटायझेशन यंत्र बनवले आहे.
सदर यंत्र पोर्टेबल असून रोज सकाळी रिक्षात बसवून रात्री घरी जाताना ते सहज काढून घरी नेता येणार आहे. रिक्षाचालकच्या डोक्यामागे वर असलेल्या जागेत हे यंत्र बसवले आहे. प्रेशर पंप बसवण्यात आलेल्या या यंत्रास मागील सीटकडे दोन व चालकाच्या बाजूला एक स्प्रे नोझल बसवले आहे. पंपातून एक पाईप सॅनिटायझरच्या बाटलीला जोडलेला असेल. रिक्षाच्या बॅटरीवर हे यंत्र चालणार आहे.
प्रवासी रिक्षात बसण्याआधी व उतरल्यानंतर बटण दाबताच पुढील व मागील सीटवर सॅनिटायझरची फवारणी होऊन रिक्षा निर्जंतुक होणार आहे. या यंत्राला आणखी एक पाईप दिला असून त्याद्वारे बाहेरून देखील पूर्ण रिक्षाचे निर्जंतुकीकरण करता येणार आहे. हे यंत्र बनवण्याचा खर्च सुमारे बाराशे ते तेराशे रुपयांदरम्यान असून कामगारांचा पगार, वाहतूक खर्च आदी धरून ते 1550 रुपयांना रिक्षाचालकांना ना नफा ना तोटा या सामाजिक बांधिलकीने देत आहोत असे सूरज तेंडुलकर म्हणाले.
माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या हस्ते या यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालिका अधिकारी आणि रिक्षा संघटनेचे निलेश फाफाळे आदी उपस्थित होते. या यंत्रामुळे रिक्षाचालक व प्रवासी यांच्या मनातील भीती दूर होऊन रिक्षा चालकांचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. शिवाय प्रवाशांना सुद्धा त्यांच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येईल असे विकास निकम म्हणाले.
CoronaVirus News : उपचारासाठी रुग्णालयात दाखलhttps://t.co/dvIYr1zFHx#AmitShah#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी