CoronaVirus News : केडीएमसीच्या ३७ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:42 PM2020-10-02T14:42:34+5:302020-10-02T14:43:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ३७ हॉटस्पॉट असलेल्या विभागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहेत

CoronaVirus Marathi News Lockdown continues in KDMC's 37 hotspots | CoronaVirus News : केडीएमसीच्या ३७ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम

CoronaVirus News : केडीएमसीच्या ३७ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम

googlenewsNext

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ३७ कोरोना हॉटस्पॉटमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. या विषयीची अधिसूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढली आहे.

३७ हॉटस्पॉट असलेल्या विभागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहेत. ३७ हॉटस्पॉटमध्ये मांडा, टिटवाळा, शहाड, बारावे गोदरेज हिल, खडकपाडा, वायलेनगर, आधारवाडी, रामबाग, सिद्धेश्वर आळी, बैलबाजार, लोकग्राम, लक्ष्मीबाग, संतोषनगर, विजयनगर, आमराई, डोंबिवली एमआयडीसी, सांगाव, सोनारपाडा, भोपर, संदप, भगवाननगर, कांचनगांव खंबाळपाडा, सारस्वत कॉलनी, पाथर्ली गावठाण, आंबिकानगर, गोग्रासवाडी, बावनचाळ, गरीबाचा वाडा, जयहिंद कॉलनी, विष्मूनगर, कोपररोड, जुनी डोंबिवली, कोपरगाव, म्हात्रेनगर, रघूवीरनगर, दत्तनगर, सुनिलनगर, तुकारामनगर, आजदे, पिसवली या विभागांचा समावेश आहे.

सार्वजनिक थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई

महापालिका हद्दीत  कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा दहा हॉटस्पॉट होते. त्यानंतर मागच्यावेळी लॉकडाऊन संदर्भात आयुक्तांनी जे आदेश काढले होते. तेव्हा ४५ हॉटस्पॉट होते. आत्ता त्यात सातने घट झाली आहे. नव्या आदेशानुसार हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला असून अद्याप शाळा, कॉलेज  सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, उपहारगृहे, मद्याचे बार सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत ५० टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. ही परवानगी देत असताना सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तिंनी सहा फूटाचे अंतर ठेवून राहायचे आहे. सार्वजनिक थुंकणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थुंकणाऱ्यांकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. सध्या महापालिका हद्दीत मास्क न घालता वावरणाऱ्या नागरीकांकडून दंड वसूलीची जोरदार मोहिम सुरु आहे. काल मास्क न वापरणाऱ्य ३४९ जणांकडून महापालिकेच्या कारवाई पथकाने १ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

Web Title: CoronaVirus Marathi News Lockdown continues in KDMC's 37 hotspots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.