Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:47 PM2020-04-25T16:47:17+5:302020-04-25T16:50:43+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आर आर हॉस्पिटलच्या वापरासाठी महिन्याला १० लाखांचे भाडे ठरवण्यात आले आहे.

Coronavirus: MNS MLA MLA charges KDMC Rs 10 lakh rent for R R hospital pnm | Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Coronavirus: मनसे आमदाराने हॉस्पिटल दिलं, पण पालिकेकडून १० लाख भाडं आकारलं?; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Next
ठळक मुद्देकल्याण डोंबिवलीत आतापर्यंत १२४ कोरोना रुग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू डोंबिवलीतील मनसे आमदाराचं खासगी हॉस्पिटल केडीएमसीने ताब्यात घेतलंहॉस्पिटलच्या वापरासाठी केडीएमसीकडून १० लाख मासिक भाडे देण्याचा करार

ठाणे – कल्याण-डोंबिवली येथे कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने प्रशासन चिंतेत आहे. आतापर्यंत केडीएमसीमध्ये १२४ कोरोनाचे रुग्ण आढळले. केडीएमसीत सगळ्यात जास्त फटका डोंबिवली शहराला बसत आहे. डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. गेल्या आठवड्यात मनसेच्या एकमेव आमदाराने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला त्यांचे स्वत: आर आर हॉस्पिटल मोफत दिल्याचं सांगितलं होतं. मात्र आता यात धक्कादायक सत्य बाहेर येत आहे.

मुंबई मिररच्या बातमीनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आर आर हॉस्पिटलच्या वापरासाठी महिन्याला १० लाखांचे भाडे ठरवण्यात आले आहे. मनसे आमदाराच्या हॉस्पिटलमध्ये आणि केडीएमसीत अशाप्रकारे एक करार झाल्याचं सांगण्यात येतंय. हे मासिक भाडे वीज, पाणी बिल, ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य खर्चांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येतं. तसेच या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा पगारही महापालिकेकडून देण्यात येणार असल्याचं करारातून उघड झालं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका आणि आर आर हॉस्पिटलमध्ये झालेल्या कराराची कॉपी या वृत्तपत्राच्या हाती लागली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत हे हॉस्पिटल भाड्याने घेतलं जाईल पण अधिकृत माहितीनुसार एप्रिल महिन्यापासून कमीत कमी ३ महिने महापालिकेने हे रुग्णालय भाड्याने घेतले आहे.  

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार केडीएमसी १२४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत विशेषत: डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून रुग्णांच्या सुविधेसाठी हॉस्पिटल पाहायचं सुरु होतं. तेव्हा मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला डोंबिवलीतील स्वत:चं आर आर हॉस्पिटल विनामोबदला महापालिकेला देण्याची तयारी दर्शवली होती. १०० बेडस् हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे मात्र सोशल डिस्टेंसिगमुळे फक्त ६५ रुग्णांची सोय याठिकाणी केली जाऊ शकते. तसेच १५ आयसीयू आणि ३ व्हेंटिलेटरची सुविधाही आहे. तात्पुरत्या स्वरुपात केडीएमसीकडून आणखी व्हेंटिलेटरची सुविधा बसवण्यात येत आहे. महापालिकेकडून हॉस्पिटला १० लाख रुपये मासिक भाडे देण्यात येत आहे याचा दुजोरा महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी केला पण याबाबत जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

मनसे आमदाराने हे हॉस्पिटल मोफत दिल्याचं सांगण्यात आलं पण करारानुसार महापालिका १० लाख रुपये भाडे देत असल्याचं उघड झालं. हा एक व्यावसायिक करार असून गेल्या ३ महिन्यांपासून हॉस्पिटल पूर्णपणे कार्यरत नव्हतं असा आरोप स्थानिक कार्यकर्त्याने केला आहे.

 कोरोनाग्रस्तांच्या मदतीला मनसे सरसावली; एकमेव आमदाराने चक्क हॉस्पिटलचं दिलं

मनसे आमदार राजू पाटील यांचा खुलासा

हॉस्पिटलला महापालिकेला देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भाड्याची मागणी करण्यात आली नाही. केडीएमसीकडून महापालिका क्षेत्रात प्रत्येक हॉस्पिटलमधील ५-१० बेड्स शोधण्याचं सुरु होतं. तेव्हा मार्च महिन्यात मी आर आर हॉस्पिटल देण्याची तयारी दाखवली. मात्र आमच्या हॉस्पिटलपूर्वी केडीएमसीने अन्य एका हॉस्पिटलशी करार केला होता. तोच फॉरमॅट केडीएमसीने आर.आर हॉस्पिटला लावला. मी तो करार पाहिलेलाही नाही. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याकडून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली असावी पण मी चांगल्या हेतूने आणि विश्वासाने हॉस्पिटल महापालिकेला दिलं होतं असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.

तसेच कोरोनाच्या संकटातही काही लोक राजकारण करत आहेत. जर मला व्यावसायिक भाडेस्वरुपात हॉस्पिटल द्यायचं असते तर मी १० लाखांपेक्षा जास्त दिलं असतं. १० लाख काहीच नाहीत. इतकचं नाही तर मी स्वत: २५ लाखांहून जास्त खर्च करुन धान्य आणि जीवनावश्यक वस्तू लोकांना पोहचवत आहे. मला स्वत: हॉस्पिटल चालवायचं असतं तर १० लाखांहून जास्त कमावले असते असंही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही; 'ही' घटनात्मक तरतूदही ठरेल उपयुक्त

बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी; शिवसेनेच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर

जाणून घ्या, कुठे आणि कोणती दुकाने उघडण्याची परवानगी?; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

...म्हणून पुढील ४८ तास महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीची पहिल्यांदाच मानवावर चाचणी

‘या’ राज्यात १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार; सरकारच्या डॉक्टर समितीने दिले संकेत

 

Web Title: Coronavirus: MNS MLA MLA charges KDMC Rs 10 lakh rent for R R hospital pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.