CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:24 AM2020-04-22T10:24:17+5:302020-04-22T10:24:45+5:30

दिवसभरात १२ नवे रुग्ण एकुण कोरोना रुग्णांची संख्या १०६

CoronaVirus more than 100 patients in mira bhayandar | CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरीपार

CoronaVirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरीपार

Next

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०६ झालेली आहे. कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली असून अजुनही ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण नव नव्या भागात आढळून येत असल्याने मीरा भाईंदरकरांनी आता गांभीर्याने घेतले नाही तर कोरोनाचा विळखा अधिक वाढण्याचा भीती व्यक्त होत आहे.

पालिकेने आज मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार कोरोनाचे १२ नवीन रुग्ण दिवसभरात आढळुन आलेले आहेत. नवीन आढळलेले रुग्ण हे मीरारोडचे शांती नगर, प्लेझेंट पार्क, एमटीएनएल मार्ग, नया नगर, शांती पार्क तर काशिमीराचे राज इस्टेट समोर येथील आहेत. मीरारोड मध्ये पसरलेले करोनाचे जाळे आता भाईंदर मध्ये देखील पसरु लागले आहे. भाईंदरच्या आंबेडकर नगर, भाईंदर फाटक, खारीगाव, शिर्डी नगर, इंद्रलोक फेज ६ या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

कोरोना चाचणीचे ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. ७० कोेरोना रुग्ण व ४ संशयीतांना भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. २४८ जणांना अलगीकरण केंद्रात तर ५५६ जणांना घरीच अलगीकरण करुन ठेवले आहे. दिवसभरात १ कोरोना रुग्ण बरा झाल्याने एकूण ११ रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत. २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Web Title: CoronaVirus more than 100 patients in mira bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.