Coronavirus:...तर ‘अशा’ लोकांना शहराच्या बाहेर हलवा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 09:02 AM2020-04-22T09:02:20+5:302020-04-22T09:08:56+5:30

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

Coronavirus: move tabligi suspected patient people out of Dombivali town Demand by MNS MLA Raju Patil to KDMC pnm | Coronavirus:...तर ‘अशा’ लोकांना शहराच्या बाहेर हलवा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी  

Coronavirus:...तर ‘अशा’ लोकांना शहराच्या बाहेर हलवा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी  

googlenewsNext
ठळक मुद्देमनसे आमदार राजू पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र डोंबिवली हॉटस्पॉट असताना बाहेरुन रुग्ण आणू नका १०० पेक्षा अधिक लोक शहरात आल्याची माहिती

ठाणे – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजार ५०० च्या वर पोहचला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. दिल्लीच्या मरकज येथील तबलीगी जमातीतील काही संभाव्य कोरोनाग्रस्तांना डोंबिवलीत आणल्याप्रकरणी मनसेने आक्षेप घेतला आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या रोगातून कल्याण-डोंबिवलीही सुटू शकली नाही. महाराष्ट्रात कल्याण-डोंबिवलीचा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्यात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागतो. आपल्या इथं रोग पसरण्यासाठी नाममात्र असलेली आरोग्यसेवा आणि काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येतं असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

तसेच जेव्हा डोंबिवली परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता व त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण २५ लोकांना आपण पाथर्ली येथील BSUP त क्वारंटाइन केल्याची माहिती आहे. याबाबत बाहेरुन रुग्ण आणू नका अशी विनंती फोनवरुन केली होती. याच पाथर्ली भागात काही दिवसांपूर्वी एक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. तसेच येथून जवळच असलेला आजदे सागर्ली भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर केला आहे. अशातच काही संभाव्य कोरोना रुग्ण ज्यामध्ये तबलीगी यांचा समावेश आहे असे एकूण १०० वर लोक इथे ठेवले आहेत  त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे हॉटस्पॉटमध्ये आढळले रुग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना उलट बाहेरचे संभाव्य शहरातील दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही. आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या तबलींगींची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल तर त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Coronavirus: move tabligi suspected patient people out of Dombivali town Demand by MNS MLA Raju Patil to KDMC pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.