Coronavirus: मुस्लिमांनी केले ‘तिच्या’वर अंत्यसंस्कार; लॉकडाऊनच्या काळात घडले माणुसकीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:31 AM2020-05-03T01:31:38+5:302020-05-03T01:31:53+5:30

कलवार यांची दोन मुले परदेशात राहतात, तर एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. प्रभा कलवार या आजारी होत्या.

Coronavirus: Muslims bury 'her'; The vision of humanity happened during the lockdown | Coronavirus: मुस्लिमांनी केले ‘तिच्या’वर अंत्यसंस्कार; लॉकडाऊनच्या काळात घडले माणुसकीचे दर्शन

Coronavirus: मुस्लिमांनी केले ‘तिच्या’वर अंत्यसंस्कार; लॉकडाऊनच्या काळात घडले माणुसकीचे दर्शन

Next

कल्याण : हृदयविकाराच्या आजाराने ७० वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पुढे आले नाहीत. अखेर, मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धावून आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे लॉकडाउनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.

कलवार यांची दोन मुले परदेशात राहतात, तर एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. प्रभा कलवार या आजारी होत्या. त्या भोईवाडा येथे राहत होत्या. पहाटे तीन वाजता त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांच्या मुलांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली, मात्र त्यांना शेजाºयांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही पुढे आले नाही. कलवार या पूर्वी रोहिदासवाड्यात राहत होत्या. तेथे त्यांच्या मुलांचे काही मुस्लिम मित्र होेते. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लिम बांधव पहाटेच उठतात. त्यांना रोझाची तयारी करावी लागते. कलवार यांच्या मुलाचा मित्र शाकीर शेख यांना समजले की मित्राच्या आईची प्रकृती खालावली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी भोईवाड्यात धाव घेतली. शाकीर यांनी त्यांचे मित्र पप्पू शेख, तौसिफ बागवान, सलमान शेख, कमरुद्दीन शेख, फारीख बिजापूर यांच्या मदतीने रिक्षा करून कलवार यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच कलवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कलवार यांचा मृतदेह घरी नेल्यावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली. हिंदू समाजात अंत्यविधी कसा केला जातो, हे जाणून घेतले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैलबाजार स्मशानभूमीत कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रजजानच्या महिन्यात शाकीरसह त्यांच्या मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा धर्म जपला आहे.

Web Title: Coronavirus: Muslims bury 'her'; The vision of humanity happened during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.