राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 11:27 PM2020-04-21T23:27:43+5:302020-04-21T23:29:46+5:30
जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आव्हाड यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःला सेल्फ क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचाऱ्यााला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन म्हणजेच 'होम क्वॉरंटाईन'चा तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानंतर यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.