CoronaVirus News: 104 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात; टाळ्यांच्या गजरात रुग्णालयाने दिला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:59 PM2020-07-03T15:59:45+5:302020-07-03T16:16:05+5:30

वयाचे शतक पार केलेल्या या आजोबांनी या आजारालाच हरवून तब्बल 12 दिवसानी ते रुग्णालयातून घरी गेले.

CoronaVirus News: 104-year-old grandfather beats Coronavirus | CoronaVirus News: 104 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात; टाळ्यांच्या गजरात रुग्णालयाने दिला डिस्चार्ज

CoronaVirus News: 104 वर्षाच्या आजोबांनी केली कोरोनावर मात; टाळ्यांच्या गजरात रुग्णालयाने दिला डिस्चार्ज

Next

ठाणे: ठाणे जिल्ह्यासह शहरी भागात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, त्यात या आजाराचा धसका घेतल्याने अनेकांची या आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठार आहे. असे असतांना, ठाण्यातील खाजगी रुग्णालयात 104 वर्षे वयाच्या आजोबांनी कोरोनावर मात करत सर्वाना एक आशेचा किरण दाखवला आहे.

वयाचे शतक पार केलेल्या या आजोबांनी या आजारालाच हरवून तब्बल 12 दिवसानी ते रुग्णालयातून घरी गेले. घरी जात असताना खाजगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि इतर स्टाफ ने त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्ह्यात कोरोन या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच या आजाराची लागण झालेल्या अनेकांनी धसका घेतल्याने त्यांना प्राण देखील गमवावे लागले आहे. असे असतांना, वयाची शंभरी पार केलेल्या आजोबांनी मात्र, या आजारालाच चीतपट करीत त्यावर विजय मिळवीत असल्याचे अनेक घटना घडत आहे. त्यात नुकतेच ठाण्यातील कौशल्य रुग्णालयातून 103 वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात करीत घर गाठले. हि घटना ताजी असतांना, पुन्हा ठाण्यातील आणखी एका खाजगी रुग्णालयातून एका 104 वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवत गुरुवारी स्वगृही परतले आहे.

कल्याण पूर्व येथे राहणारे 104 वर्षीय आजोबाना त्रास होवू लागल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्या अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्यचे समोर आले. त्यानंतर त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर उपचार करीत असतांना, त्यांना निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर रुग्णालयाच्या पथकाने अथक परिश्रम घेतल आणि अखेर 104 वर्षाच्या आजोबांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विरुद्धची लढाई जिंकली. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि इतर स्टाफ ने त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: CoronaVirus News: 104-year-old grandfather beats Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.