CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२०७ नवे रुग्ण, २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 09:00 PM2020-08-09T21:00:07+5:302020-08-09T21:01:41+5:30

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.

CoronaVirus News: 1207 new cases of corona in Thane district, 29 deaths | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२०७ नवे रुग्ण, २९ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२०७ नवे रुग्ण, २९ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार २०७ रुग्णांची रविवारी वाढ झाली. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ९८हजार १६७ झाली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार ७४७ झाली आहे. 
 
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत ६९५  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २९७ रुग्णांची आज वाढ झाली. तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ४५२ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ४४० झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत ३२३ रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १८ हजार ४८१ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४६९ झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज तीन मृत्यू झाला आहे.  तर 23 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या १५७ तर सात हजार १३७ बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात आज २३ बधीत आढळून आले. तर आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आता बाधितांची संख्या तीन हजार ७७९ झाली आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या २५८ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज १६४ रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ५८३ झाली, तर, मृतांची संख्या ३१३ झाली आहे. 

अंबरनाथमध्ये आज ६६ रुग्णांची वाढ तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार २४८ झाली. तर, मृतांची संख्या १६६ आहे. बदलापूरमध्ये ५४ रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ६७ झाली. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ५१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात ४६ रुग्णांची वाढ झाली. आज चार मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या सात हजार ४१६ आणि मृतांची संख्या १९८ झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: 1207 new cases of corona in Thane district, 29 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.