CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1212 रुग्णांची नव्याने वाढ, 31 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:42 PM2020-08-31T20:42:20+5:302020-08-31T20:45:22+5:30
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 188 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 212 रुग्णांची नव्याने सोमवारी वाढ झाली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 24 हजार 177 वर गेली आहे. तर 31रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्याआतापर्यंत तीन हजार 550 झाली आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 188 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 25 हजार 909 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 839 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 378 रुग्णांची आज वाढ झाली असून दहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 हजार 15 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 630 झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 289 रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 26 हजार 149 झाली आहे. तर, मृतांची संख्या 588 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज एकाचा मृत्यू झाला आहे. तर 48 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 226 तर बाधीत रुग्ण सात हजार 805 झाले आहेत.
भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त सात बाधित आढळून आले. तर आज केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या चार हजार 187 झाली असून मृतांची संख्या 284 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 150 रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 12 हजार 606 झाली, तर, मृतांची संख्या 421झाली आहे.
अंबरनाथमध्ये आज 20 रुग्णांची वाढ तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार 959 झाली. तर, मृतांची संख्या 186 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 55 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 132 झाली. या शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 71 आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 77 रुग्णांची वाढ झाली. आज पाच मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या नऊ हजार 415 आणि मृतांची संख्या आजपर्यंत 305 झाली आहे.