CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 1510 रुग्ण, तर 39 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:57 PM2020-07-06T20:57:56+5:302020-07-06T21:13:58+5:30
CoronaVirus News: सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोना बाधित रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. दिवसभरात 1510 बाधितांची तर, 39 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 43 हजार 926 तर मृतांची संख्या 1308 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल 413 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्या खोलाखाल ठाण्यात 268 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 9 हजार 499 तर, मृतांची संख्या 144 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 268 बाधितांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 999 वर गेली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 416 झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 164 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 957 तर, मृतांची संख्या 252 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 88 बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 407 तर, मृतांची संख्या 120 वर पोहोचली. मीरा भाईंदरमध्ये 157 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार तर मृतांची संख्या 166 इतकी झाली आहे. उल्हासनगर 159 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 969 तर तिघांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 57 झाली आहे.
अंबरनाथमध्ये 56 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 252 तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 75 झाली आहे. बदलापूरमध्ये 38 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर बाधितांची संख्या 1 हजार 11 झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 17 झाली आहे. तर, ठाणो ग्रामीण भागात 167 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 361 तर मृतांची संख्या 61 वर गेली आहे.
आणखी बातम्या...
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत