CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:34 AM2020-07-18T02:34:58+5:302020-07-18T02:35:20+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे.

CoronaVirus News: 1707 Corona infected in Thane district on Friday; Health department information | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती

Next

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणात घट झाल्याचे आढळले. गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७०७ नविन रुग्णांसह ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजार १०५ तर मृतांची संख्या ही एक हजार ८२७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नव्या ३१२ बाधितांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार १७४ तर मृतांची ५५७ वर गेली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही २४० रुग्ण दाखल झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता दहा हजार ७८६ तर मृतांची ३३० वर पोहोचली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १६५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या सहा हजार २४० तर मृतांची २१५ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातही ३९ बाधीतांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उल्हासनगरात २३७ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची पाच हजार २८४ तर मृतांची संख्या ही ७७ वर पोहचली आहे.
अंबरनाथमध्ये ९६ रुग्ण नव्याने दाखल झाले तर एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९६६ तसेच मृतांची संख्या ही ११२ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ६४ रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ७६७ तर मृतांची संख्या २६ झाली. ठाणे ग्रामीण भागात ११७ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८७७ तर, मृतांची संख्या १०६ वर गेली.


जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मादान
कोरोनातून बरे झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत रु ग्णालयात जाऊन प्लाझ्मादान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Web Title: CoronaVirus News: 1707 Corona infected in Thane district on Friday; Health department information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.