Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:58 PM2020-06-07T23:58:10+5:302020-06-08T00:01:08+5:30

एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. रविवारी दिवसभरात एका महिलेसह तिघांचा मृत्यु झाला.

Coronavirus News: 1843 patients in Thane overcome coronavirus, three die | Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु

मृतांमध्ये एका महिलेचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देमृतांमध्ये एका महिलेचा समावेशमृतांची संख्या झाली ११६

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात १३८ कोरोनाच्या नविन रुग्णांची भर पडली असून ही संख्या दोन हजार ९८ च्या घरात पोहचली आहे. एका महिलेसह तिघांचा दिवसभरात मृत्यु झाला असून ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्या सुमारे ५४ टक्के म्हणजे एक हजार ८४३ इतकी नोंद झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणा-या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. शनिवारी २५ हजार १६१ रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी २४ हजार ९६३ अहवाल प्राप्त झाले. रविवारी १३८ नविन रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ९८ इतकी झाली आहे. तर दोन पुरुष आणि एका महिलेच्या मृत्युमुळे मृतांची संख्या ११६ झाली आहे. आतापर्यंत ३९ महिला आणि ७७ पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे.

 

Web Title: Coronavirus News: 1843 patients in Thane overcome coronavirus, three die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.