CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०९ नवीन कोरोनाबाधित, मृतांचा आकडा ७७४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:44 AM2020-07-17T02:44:32+5:302020-07-17T02:44:51+5:30
नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १,९०९ बाधितांसह ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२,३९८, तर मृतांची १,७७४ इतकी झाली.
कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ५२४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालिका क्षेत्रात ४१३ बाधितांसह १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये १२५ रुग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेत ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उल्हासनगरमध्येही २०२ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.
वसई-विरारमध्ये ३०१ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी दिवसभरात ३०१ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ९,०६१ झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ११७ रुग्णांनी या आजारावर मात केली असून एकूण ६११८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात सध्या २७६४ रुग्ण उपचार घेत आहेत.