CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १ हजार ३६८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, ४२ जणांच्या मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 08:22 PM2020-08-12T20:22:18+5:302020-08-12T22:59:53+5:30
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 407 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत दररोज चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारप्रमाणे बुधवारीही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात एक हजार 368 रुग्णांची तर, 42 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख एक हजार 576 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 873 झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 407 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 19 हजार 440 तर, मृतांची संख्या 486 वर पोहोचला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात 368 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 23 हजार 217 तर, मृतांची संख्या 466 इतकी झाली आहे.
ठाणे महानगर पालिका हद्दीत 199 बाधितांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 22 हजार 530 तर, मृतांची संख्या 713 वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये 178 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 10 हजार 96 तर, मृतांची संख्या 328 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 19 बधीतांसह 4 मृत्यू झाला असून बाधितांची संख्या 3 हजार 826 तर, मृतांची संख्या 266 झाली. उल्हासनगर 27 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 212 तर, मृतांची संख्या 164 झाली आहे.
अंबरनाथमध्ये 44 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 358 झाली. बदलापूरमध्ये देखील 57 रुग्णांच्या नोंदीसह 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 215 तर, मृतांची संख्या 55 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 69 रुग्णांची तर, 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 682 तर, मृतांची संख्या 227 वर गेली आहे.